निसर्गाचे काही शाश्वत नियम आहेत ज्याचे पालन सर्वानाच करावे लागतात. जन्म-मृत्यु आणि त्यानंतर पुन्हा जन्म हे परिवर्तन चालूच राहते. ह्या परिवर्तानाचा अनुभव सर्वाना आज नाही तर उदया करायचाच आहे. मृत्यु हा शब्द ऐकल्यावर स्वस्थ असणारा व्यक्ति ही घाबरून जातो कारण पूर्ण आयुष्यामध्ये ह्याची तयारी कोणीही करत नाही. जीवनात येणाऱ्या प्रत्येक घटनेची आपण पहिल्यापासून तयारी करतो मग ती मानसिक, शारीरिक, आर्थिक… असो पण ज्याची शाश्वती आहे त्याची तयारी करण्यास ही आपण घाबरतो. मृत्यु म्हणजे नक्की काय किवा मृत्यु खरच भयानक आहे की एक सुन्दर अवस्था आहे ह्याची समज आपल्याकडे नाही. कारण मृत्यु झाल्यानंतर वा होत असताना नक्की काय होते ह्याची माहिती आज पर्यत कोणीही आपल्याला दिली नाही. जसे एखादा व्यक्ति घर सोडून जातो तर ‘मी सुखरूप पोहोचलो की नाही ह्याची बातमी आपल्याला देतो पण मृत्यु झालेला व्यक्ति कुठे गेला, काय झाले हे आपल्याला कधीच कळत नाही. म्हणून मृत्यु ही घटना दुःखी करणारी वाटते.
विज्ञानाने near death experience किवा out of body experience ची काही उदाहरण आपल्या समोर ठेवली आहेत. ज्यामुळे आपण त्या घटनेला समजू शकतो. शरीर हे एक साधन आहे ज्यामध्ये प्राण (आत्मा) आहे. आत्मा आणि शरीर ह्या दोघांमुळे हे जीवन आहे. जर आत्मा शरीरापासून वेगळी झाली तर त्याला आपण मृत्यु म्हणतो. जन्म अर्थात आत्म्याचे शरीरात येण आणि मृत्यु अर्थात शरीरातून बाहेर निघून जाणे. आत्म्याचे शरीर हे घर आहे. ह्या शरीरा मध्ये राहून ती सर्व अवयवांचा उपयोग करते. पण शरीर साधन असले तरी आज आत्मा ह्या सधानाच्या वशीभूत आहे. ह्या कर्मेंद्रियांच्या रसामध्ये आत्म्याचे अस्तित्व समाप्त होत आहे. मी आत्मा आहे हे विसरून गेलो आहोत. मी म्हणजे नाव, पद, जाती, संपत्ति……..ही लेबल घेउन आपण फिरत आहोत. ह्या सर्वाच्या प्राप्तीसाठी कष्ट करत आहोत. पण सर्व काही प्राप्त करून ही शेवटी रिकाम्या हातानीच सर्वाना जायचे आहे हे सत्य लक्षात ठेवावे. सुखाच्या प्राप्तीसाठी परिश्रम अवश्य करावे परन्तु त्याना मिलावन्याचा मार्ग, केलेले कर्म आत्मा आपल्या बरोबर घेउन जाते हे मात्र निश्चित आहे. जे मिळाले ते सर्वच सोडून जायचे आहे. म्हणून कोणत्याही बंधनात न बंधता कर्म करण्याची कुशलता आत्मसात करावी.
व्यक्ति, वस्तु, साधन….. कितीतरी गोष्टींच्या बंधनात आपले जीवन गुरफटलेले आहे. पण जेव्हा ह्यातुन मुक्त होण्याचा अनुभव केला तर आपली जगण्याची रीतच बदलून जाइल. असेच एक उदहारण आपल्या समोर मांडत आहे. एच. बी. क्लार्क अनेक वर्ष बांधकाम इंजिनिअरचे काम करीत होते. कामानिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यात जावे लागायचे. ते बुद्धीवादी, अबोल आणि वस्तुस्थितीवर विश्वास ठेवणारे होते. एका रात्री त्यांच्या हृदयाचे कार्य मंदावले, रक्तदाब कमालीचा खाली उतरला. शारीरिक संवेदना मेल्या होत्या. डॉक्टरांनी आशा सोडली होती.
डॉक्टरांनी त्याच्या सर्व नातेवाईक, मित्र-संबंधींना त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सांगितले. सगळ्यांनी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी डोळे उघडले आणि काही दिवसांनी बोलू लागले. त्यांच्या हृदयाचे कार्य आणि रक्तदाब पूर्वीसारखा सामान्य झाला. ठीक झाल्यावर त्यांनी सांगितले, “ माझ्या आजारपणाच्या काळात माझ्याबाबतीत कधीतरी, खूप वेगळे काहीतरी घडले. मला त्याचे वर्णन करता येणार नाही, असे दिसत होते. जणू मी दूर कुठेतरी आहे. मी पूर्वी कधी न पाहिलेल्या अशा एका रमणीय स्थळी होतो. माझ्या अवती-भोवती प्रकाश पसरला होता, रम्य प्रकाश. मला काही दयाळू चेहरे अस्पष्टसे दिसत होते. मला खूप शांत व आनंदी वाटत होते. खरं सांगायचे तर इतका आनंद मला आयुष्यात झाला नव्हता.”
मग माझ्या मनात विचार डोकावला, “ कदाचित मी मरत असेन.” मग मला कळले “ कदाचित मी मेलो आहे.” मग मी मोठ्याने हसलो आणि स्वतःला विचारले, “ मला आयुष्यभर मृत्यूची इतकी भिती का वाटायची ? त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही.”
त्यांना विचारले की “ त्यावेळी तुम्हाला कसे वाटले ? या जगात परत यावेसे वाटले ? ” ते उत्तरले “ मला वाटते त्या रम्य स्थळी राहणेच मी पसंत केले असते.” हा एक भ्रम वा स्वप्न नव्हते. अशा अनेक लोकांशी बोलण्यात अनेक वर्ष घालवली होती, जे मरणाच्या काठावर जाऊन त्या पलीकडचे पाहून आले आहेत. तिथे केवळ प्रकाश, शांती आणि सौंदर्य होते.
त्यानंतर ह्या व्यक्तीची व्यव्हार करण्याची पद्धत बदलली कारण आयुष्याचा शेवट आपल्याला कुठे घेउन जाणार ह्याचे स्पष्ट ज्ञान मिळाले. पिंजरा कितीही सुंदर असला तरी पक्षासाठी ती कैदच असते तसेच शरीर आत्म्यासाठी पिंजरा आहे. ते कितीही सुंदर असले तरी आत्म्याला ते अनेक प्रकारे बांधून ठेवते. पण ह्या कैदेतून सुटका तेव्हा होऊ शकेल जेव्हा आत्मा शरीराचा त्याग करेल. म्हणून मृत्यु ही आत्म्याची बंधनमुक्त अवस्था आहे.
— ब्रह्माकुमारी नीता
nice article