आपल्या ज्योतिषशास्त्रात ‘शनि’ ही मृत्यु देवता आहे. ही देवता आपल्यावर प्रसन्न राहावी यासाठी पूजा करतो पण ती मारुतीची..! शनी आणि मारूती यांचा संबंध काय, याचा माझ्या परीने विचार करताना एक तर्क मांडता येतो..
‘मारुती’ या शब्दाचं, मराठीतल्या ‘मृद’ या शब्दाशी जवळचं, सख्खं असं नात असलं पाहीजे असं मला वाटतं..’मृद’ म्हणजे माती आणि आपणं मरतो म्हणजे तरी काय, मातीतच मिसळतो ना? ‘मारुती’ हा ‘मरुत’ म्हणजे वार्याचा पुत्र आणि ‘मरूत’ या शब्दाचं ‘मृत’ या शब्दाशी असलेलं कमालीचं साघर्म्य मला आश्चर्यकारक वाटतं..! त्यांचा संबंध नक्की असला पाहिजे. ‘शनिवार’ हा शनिग्रहाच्या कृपादृष्टीसाठी जरी पाळत आपण असलो तरी पूजा मात्र मारुतीची करतो..हिन्दू धर्मशास्त्रात ‘शनी’ ही मृत्यू देवता मानली गेली आहे..याचाच अर्थ मारुतीची पूजा म्हणजे साक्षात ‘मृत्यू’ची पूजा..
दुसरा तर्क असाही करता येईल की, मारूती ‘चिरंजीव’ आहे. चिरंजीव याचा अर्थ ज्याला ‘मृत्यु’ नाही तो..! आणि नीट विचार केला तर या जगात ‘मृत्यु’ व्यतिरिक्त काहीच ‘चिरंजीव’ नाही..म्हणून मारुती ‘चिरंजीव’ आहे..’मृत्यू’ चिरंजीव आहे..
आता पुन्हा शनी आणि स्त्री या सध्याच्या हॉट विषयाकडे येऊ. शनिचं दर्शन स्त्रियांनी घ्यावं किंवा नाही असाच काहीसा तो विषय आहे..
स्त्रियांना शनीचं दर्शन निषीद्ध असणं ही एक प्राचीन प्रथा असावी. नविन जीवन स्त्रीच्या गर्भशयातूच जन्म घेतं, त्या जन्मात पुरूषाचा सहभाग माहित नसण्याच्या काळात ही प्रथा पडली असावी..’मृत्यूदाता’ शनीचा ‘दृष्टी’ ‘जन्मदात्या’ स्त्रीवर पडू नये येवढाच दृष्टीकोन या प्रथेमागे असावा असा माझा तर्क आहे..अपत्य जन्मात पुरूषाचाही सहभाग असतो हे नंतर लक्षात आल्यावरही, स्त्रीचं दुय्यमत्व कायम राहावं म्हणून पुरूषांनी या व अशा प्रथांचा हत्यार म्हणून वापर केला असावा यावर दुमत नसावं..!
दुसरं म्हणजे शनी प्रसन्न व्हावा यासाठी आपण ज्या मारूतीची पुजा करतो, तो मारूती ‘ब्रम्हचारी’ आहे व अशा ब्रम्हचार्याच्या मठीत स्त्रीचं काय काम असा विचार शास्त्रकर्त्यांनी केला असावां. ही प्रथा पुरूषही मुलाच्या जन्मात सहभागी असतो याचं आकलन झाल्यानंतर पडली असावी. पण मला वाटतं की स्त्रियांसाठी ‘ब्रम्हचारी मारूती’ किंवा ‘शनी’ इतकी बायकांसाठी सेफ देवता दुसरी नसावी. बिनधास्त दर्शन घ्यावं, शिलरक्षणाचा प्रश्नंच उद्भवणार नाही.
शिंगणापूरच्या शनी चौथर्यावर जशी स्त्रियांना बंदी आहे तशी काही आपल्या देशातल्या काही ठिकाणच्या ‘नागवेलीं’च्या शेतांतही स्त्रियांचा प्रवेश निषिद्ध आहे..
आपल्या बहुतेक प्रथा स्त्री-पुरूष संबंधावर आधारीत असाव्यात असा माझा अभ्यास सांगतो व नागवेलीच्या मळ्यात स्त्रियांना बंदी का याचंही उत्तर बहुदा तिथंच दडलेलं आहे..!!
(‘चिरंजीव’ या शब्दाचा अर्थ ‘ ज्याला मृत्यू नाही’ असा आपण घेत असलो तरी तो तसा नाही. त्याची माहिती नंतर कधीतरी देईन.)
— गणेश साळुंखे
9321811091
Leave a Reply