बस्तर व बिजापूर हे छत्तीसगड मधील नक्षल चळवळीचे महत्वाचे जिल्हे, बिजापूर जिल्ह्यातील सारकेकुडा, कोटागुडाव राजपेटा या तीन खेड्यात रात्री गावकीची सभा चालू असताना SRP नी कोणतीही सूचना न देता बेछुट गोळीबार केला, पळापळ झाली, सभा उधळली दुसर दिवशी चंद्रमोळ्या झोपडयां समोर पुरुष व मुलांची प्रेते कापडात गुंडाळलेली, हताश होऊन कपाळाला हात लाऊन बसलेली गावकरी मंडळी त्यात नक्षलवादी तर खरे कोणीच नव्हते,असा गावकऱ्यांचा ठाम दावा, काहीं मृत शरीरावर कुऱ्हाडीचे घाव होते ही सत्यस्थिती होती, आमचे पोलीस असले निर्घृण कृत्य कधीच करणार नाहीत, असा सरकार कडून फतवा काढण्यात आला. गावातील नागेश, महेश आणी सोमळू ही १५ ते १९ वर्षाची तरुण मुले कट्टर नक्षलवादी होती, हेही तितकेच खरे होते. नक्षलवादी अशा तरुण मुलांना हाताशी धरून त्यांचा ढाली सारखा उपयोग करीत असून ही त्यांची नवीन चाल आहे, अशा अनेक तरुण मुला मुलीना आमिष दाखवून गनिमी युद्धाचे शिक्षण देऊन परत खेड्यात पाठवितात खंडणी वसूल करण्यासाठी.
काका नागेश हा १८ वर्षाचा १० वी च्या परीक्षेत जिल्हा शाळेतून पहिला आलेला इंग्रजी जाणणारा नेहमीला वसतीगृहात राहणारा, दुर्देवाने त्या घातक दिवशी दिवसभर घरीच अभ्यास केल्यानंतर रात्री दाट काळोखात सभेच्या जागी काय भाषणे चालली आहेत याच्या उत्सुकतेने बघण्यास गेला. या तीन खेड्यात नक्षलवादी आपला पाय रोवण्यासाठी गेले कित्येक महिने प्रयत्नशील आहेत याची गुप्त माहिती खबऱ्या कडून सरकारी फौजेला मिळाली होती. सभेचा गैरवापर करून सरकारी फौजांची निघृण हत्या करण्याचा डाव फौजेनी उधळून लावला, सभेत नक्षली वेष परिधान केलेली दोन तरुण मुले होती, त्यांच्या कडे कोणतीच हत्यारे नव्हती, नक्षलींचा प्रमुख संदीप म्हणतो; ”सरकारी फौजेवर कोणतही हल्ला झालेला नव्हता, तसे असते तर काही प्रतिकार झाला असता, एखादा पोलीस मृत वा घायाळ झाला असता तसे काहीच झाले नाही, तुफान गोळीबार करणे हे आमचे ब्रीदवाक्य आहे, आमच्यातील जखमी व मृताना आम्ही खांद्यावर घेऊन जंगलात पळून जातो, पण या जागी १९ देह सगळेच्या सगळे त्याच जागी पडले होते.. काका नागेशच्या शाळेत वृत्त कळताच शाळेवर शोककळा पसरली, शाळेच्या शिक्षकानी नागेश हा कधीच नक्षली नव्हता याची ग्वाही दिली, एक चकाकणारा हिराच जिल्ह्याने गमावला.
गोळीबारात ठार झालेल्या मृत देहांवर नक्षलवादीनी पोलीस यंत्रणेला चकविण्याचा डाव रचून कुऱ्हाडीने घाव घातले का? सगळाच मामला गुंतागुंतीचा असून नाहक बळी गावकऱ्यांचे पडले आहेत. या हत्याकांडाची तुलना जालीयनवाला बागेशी केली गेली, एकच मतितार्थ आहे निष्पाप आदिवासींची शोकांतिका.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply