सुर्यास्त जवळ आला
पायाखाली रेगाळणारी सावली
पाठमोरी झाली
पाखरांचा गलका परता परता घरट्यात
असा सुचक संदेश देऊ लागला..
शिवारात एकच गडबड
पश्चिमेला सुर्य
झाला डोगंराआड.
पाय गुमाण घराच्या ओलीन अंधार चिरत
चुल पेटवली होती तिनं
पातेल्यात शिजत होते चार दाने खदखदत
आयुष्याचे….
खाऊणघ्या…पिऊन गटा गट पाणी…मोजा चांदणे…
काळोखात लुकलुकणारे
स्वप्न!
आणि झाला उल्कापात
बघून सुधा मागणे मागता नाही आले
या जिनगानीसाठी.
@शरद शहारे वेलतूर
Leave a Reply