आलास, ये वरूणराजा
वाट पाहतो आहोत,
अगदी चातकागत,—
थोडा रेंगळ आमच्यासमवेत, भिजवून टाक धरणीला,
तुझ्या संततधारेने,
अरे तिला संजीवन दे रे,–!!!
ती तडफडत्ये उन्हाने,
रणरणतेपण खाते रे तिला, नखशिखांत भिजू देत तिला,
तुझ्या जलप्रवाहांनी,—
तरसता, पोळलेला तडफडतां, माणसाचाही आत्मा,—
होईल संतुष्ट तिच्या भिजण्याने, धरती एकदा तृप्त होऊ दे,
चराचर सृष्टी होऊ दे समाधानी,
तू फक्त ये ,-ये -आणि ये,
रेंगाळत रहा पृथ्वीवर,—
बास, आजच्या घडीला,
नकोच आणखी काही,
डोळा लावून बसलेत,
आभाळाकडे सगळे,–!!!!
पाणी बरसू देत,जोरदार,
होईल धरती ओलेती,
सगळीकडे होईल हिरवेगार,
चारच दिवसात फक्त,
संपेल सगळा रखरखाट,
तप्तपणा, काहिली,
जीवाची कासाविशी,
थांबतील घामाच्या धारा ,–!!!!
तुझ्या धारा बरसल्या की,
तुझ्या धारा बरसल्या की,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply