महिला दिनानिमित्त,
स्त्रीत्वाच्या साऱ्या आभाळाला,
पेलणे सोपे नाही,
नाजूक साजूक धाग्यांना,
कणखर बनवणे सोपे नाही,
कुठे कुठे पोहोचत,
उंची गाठत, आपले हात, फैलावत, ध्येय गाठणे सोपे नाही,
कर्तव्यकर्मांचे विळखे सांभाळत,
सांभाळत जगणे सोपे नाही,
आपले ध्येय गाठताना,
खंबीर भूमिका निभावणे,
याच अंतिम हेतूने जगणे,
सोपे नाही,
संवेदना भावना यातना वेदना,
सोसत निमूट श्वास घेत राहणे, सोपे नाही,
कुठल्या क्षेत्रात मागे नाही,
राधा मीरा वहिदा,
किती रुपे निभावते,
पुरुषाला यश आनंद समाधान,
नव्हे मातृत्वच बहाल करते,
हळूहळू ,—!!!!!!
न देण्याला सीमा न करण्याला,
विचार बुद्धी भावना क्षमता कर्तृत्व,—-!!!!! ,
कसोशी ,खरीच धनीण ती,
काय नसते तिच्यात,
तीच अन्नपूर्णा, गृहिणी, दामिनी, कामिनी,
शेवट माता असेच ना सगळे रेशमी बंध ,–!!!!!
स्वतः मात्र विमुक्त,—!!!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply