नवीन लेखन...

मुक्तीचा मंत्र

द्वैतवादाचा पुरस्कार करणारे रामानुजाचार्य दक्षिण भारतातील एक मोठे संत म्हणून प्रसिद्ध आहेत. लहानपणापासूनच त्यांना धर्मतत्त्वज्ञानाची फार आवड होती. या संदर्भात धर्मविषयक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ते एका गुरुकडे जाऊ लागले. त्या वेळेला ते फक्त रामानुज होते. रामानुज अतिशय चिकित्सक असल्यामुळे गुरुकडे होणाऱ्या अध्ययनाच्या वेळी ते नानाविध प्रकारच्या शंका उपस्थित करीत व त्यांचे गुरूही न कंटाळता त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करीत. अध्ययन संपल्यानंतर गुरूंनी रामानुजाला मुक्तीचा मंत्र सांगितला. मात्र त्याचबरोबर त्यांना हेही सांगितले की, हा मंत्र योग्य त्या व्यक्तीलाच व धार्मिक विधी करूनच तू देऊ शकतोस. हा मंत्र तू कोणालाही देऊ लागलास तर माझ्यासारख्या गुरूची आज्ञा भंग केल्याबद्दल तुला नरकवासाची शिक्षा मिळेल.

गुरूंचा आशीर्वाद घेऊन रामानुज त्यांच्या आश्रमातून बाहेर पडले. विविध ग्रंथांचा सखोल अभ्यास केल्यानंतर रामानुज ‘रामानुजाचार्य’ झाले. अनेक लोक भक्तिभावाने त्यांच्याकडे येऊ लागले. त्यामध्ये खालच्या स्तरातील लोकही होते आणि रामानुजाचार्यांनी जात-पात वर्ण न पाहता इच्छुकांना मुक्तीचा मंत्र देण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी ही गोष्ट त्यांच्या गुरूला समजली. त्यामुळे आपल्या आज्ञेचा भंग केल्याबद्दल त्यांना रामानुजाचार्यांचा राग आला. त्यांनी त्यांना बोलावून घेतले व या गोष्टीचा जाब विचारला. त्यावर रामानुजाचार्य म्हणाले की, कोणत्याही जातीत जन्म घेतलेले लोक ही सारी ईश्वराचीच लेकरे आहेत. त्याना मी धर्मबांधव समजतो. त्यामुळे त्यांच्यात जात-वर्णानुसार उच्च-नीच असा भेदभाव करणे मला तरी अयोग्य वाटते. त्यामुळे मी ज्याची प्रामाणिक इच्छा असेल त्यांनाच हा मुक्तीचा मंत्र दिला. त्याच्यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला, भले नरकवास पत्करावा लागला तरी चालेल. तो मी आनंदाने भोगायला तयार आहे.

रामानुजाचार्यांचे ते बाणेदार उत्तर ऐकूण गुरुही प्रभावित झाले व तूच माझा खरा शिष्य असे सांगून त्यांनी त्यांचा गौरव केला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..