बालपणात
एकत्र खेळतात सगळे मुलंमुली
वय वाढत जाते भवतालचं
मुलीचं वय जरा लवकरच वाढत असते .
‘आता तू मोठी झालीस ‘ ऐकू येते
वेळीच एकत्र खेळणं थांबवावं
…….असं वाटणं अनुभवाचं .
कसं सांगावं
वेगळे असतात आतून सगळे
वेगळे असतात स्पर्श
वेगळे असतात खेळ
वेगळ्या असतात नजरा
आणि
मुलात माणूस
अन माणसात नरपण , पशूपण वाढत असते .
— कौशल ( श्रीकांत पेटकर )