टि सी ला आलेला पाहून पुणेकर जोशी काका उभे राहिले आणि आपलं तिकीट शोधू लागले .
पहिले शर्ट ची खिसे तपासली, मग पँट ची खिसे तपासली, मग बनियन चा पण खिसा तपासला …
मग एका मुंबईकर ने विचारले,”काय शोधताय?”
जोशी काका,”तिकीट …!”
मुंबईकर हसून,”मग तुमच्या तोंडात काय आहे ?”
जोशी काका,”अरेच्चा, हो की …!”
ते अर्धवट भिजलेलं तिकीट कसंबसं तपासून टि सी गेला …!
मग काय मुंबईकरांनी पुणेकर जोशी काकाच्या विसरभोळे पणाची टिंगल उडवली …!
शेवटी जोशी काका त्यांना मुर्खात काढत म्हणाले,”ते तिकीट कालचं होतं . मी मुद्दामून तोंडात धरुन त्यावरची तारीख उडवली .
तुम्हा मुंबईकरांना नाही कळायचं …!”
मुंबईकर शाॅक्स …!
पुणेकर राॅक्स …!
Leave a Reply