नवीन लेखन...

मुंबईतील पुतळे – हलवलेले आणि हरवलेले – ‘लॉर्ड कॉर्नवॉलीस’

‘हलवलेल्या व हरवलेल्या पुतळ्यां’च्या तिसर्‍या भागात ‘लॉर्ड कॉर्नवॉलीस’ या भारताच्या तत्कालीन गव्हर्नर जनरलच्या पुतळ्याची माहिती आहे..हा ‘पुतळा’ त्याच्या नांवा-ठिकाणासकट लोकांच्या विस्मृतीत गेला आहे.. तरी या पुतळ्यांने जी धमाल त्या काळी उडवली होती त्यातून हिन्दू समाजाच्या मानसिकतेचं चांगलंच दर्शन होतं.. त्याची माहिती मी पुढच्या चौथ्या व शेवटच्या भागात देणार आहे.

आपल्या एशियाटीक सोसायटीच्या समोर असलेलं ‘हॉर्निमन सर्कल’ सगळ्यांच्याच परिचयाचं आहे.. हे पूर्वीचं ‘एलफिन्स्टन सर्कल’.. त्याही पूर्वी हा भाग ‘बॉम्बे ग्रीन’ या नांवाने ओळखला जायचा.. हे एक मुद्दाम राखलेलं सपाट मैदान होतं… एशियाटीक सोसायटीच्या विस्तृत पायर्‍या म्हणजे व्यासपीठ आणि समोर सर्व जनता बसण्याची जागा असा उपयोग करून ‘कोटा’तले त्या काळातले सर्व महत्वाचे सार्वजनिक कार्यक्रम या जागी होत असत.. इतर वेळी बैलगाडीवाले, टांगा-व्हिक्टोरीयावाले, पालखीवाले इत्यादी सार्वजनिक वाहतूक करणारे या मैदानाभोवती भाड्याची वाट बघत उभे असत..

lord-cornwalis-staue-in-mumbaiतर,या हॉर्निमन सर्कलमध्ये चर्चच्या बाजूकडील प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर समोरच काही अंतरावर एक गोलाकार कारंजं दिसतं.. या कारंजाच्या समोरच, आपल्या उजव्या हाताला एका देवळीत पूर्वी लॉर्ड कॉर्नवॉलीसचा पुतळा होता.. अर्थात देवळी आणि पुतळा पहिला बसवला व बागे सभोवती आता आपण जे लोखंडी कुंपण पाहतो ते नंतर बसवलं गेलं असा उल्लेख श्री. शिंगणे यांच्या ‘मुंबईचा वृत्तांत’ या पुस्तकात मिळतो.. आपल्या देशातील सामान्य नागरीकांना आजही नाडणार्‍या प्रशासकीय व महसूली कायद्यांची सुरूवात या कॉर्नवॉलीस महाशयांनी करून देशात ‘ब्रिटीश राज’चा पाया भक्कम केला होता.. हे साहेब लढवय्येही होते.. मैसूरच्या टिपू सुलतानाच्या मुलांना बंदी बनवून टिपूकडून मोठी खंडणी आणि व्यापारी सवलती यांनी उकळल्या होत्या..

हा पुतळा स्वराज्यात इथून त्याच्या देवळीसह हलवला गेला व सध्या तो भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड म्युझीयमच्या इस्ट लॉनवर व्हिक्टोरीयाच्या पुतळ्याच्या लायनीत मुंडकं व हात छाटलेल्या अवस्थेत ‘उभा’ आहे..

जाता जाता-

‘स्वराज्या’तील देशी राज्यकर्त्यानी याचा पुतळा जरी हलवला असला तरी यांने बनवलेल्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आजही ते इमानेइतबारे करून जनतेला ‘ब्रिटीश राज’चा अनुभव देत आहेत हे आपण रोजच पाहत असतो.. जणूकाही याचं छाटलेलं मुंडकं आपणच निवडून दिलेल्या राज्यकर्त्यानी अदृष्यरित्या धारण केलेलं असून याचा छाटलेला हात प्रशासनाने स्वत:ला बसवून घेतला आहे..! ‘ब्रिटीश राज’चा पाया भक्कम करण्यासाठी आणि तत्कालीन ब्रिटीश इंडीयाची जरब त्या काळातील लोकांवर बसवण्यासाठी कॉर्नवॉलीसने तयार केलेल्या कायद्यांची अंम्मलबजावणी (फक्त सामान्य जनांसाठी) आजही तेवढ्याच काटेकोरपणाने सुरू ती काय उगीच नव्हे..!!

— गणेश साळुंखे

मुंबईतील पुतळे; हलवलेले आणि हरवलेले..(भाग ३ )

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

1 Comment on मुंबईतील पुतळे – हलवलेले आणि हरवलेले – ‘लॉर्ड कॉर्नवॉलीस’

  1. नमस्कार.
    -मुंबईबद्दल आपल्याला अफाट माहिती आहे, व ती आपण share करता, याबद्दल धन्यवाद.
    -लॉर्ड कॉर्नवॉर्लिस हा अमेरिकेतही, स्वातंत्र्ययुद्धपूर्व काळात लढाया खेळलेला आहे. म्हणजेच, दोन देशांमधे त्यानें महत्वपूर्ण (चांगली-वाईट) कामगिरी केली आहे.
    – वेलस्लीचें ही एक प्रकारें असेंच आहे. भारतात तर तो परिचित आहेच, पण नेपोलिनकालीन युरोपमधेही त्यानें महत्वाचें कार्य केलेलें आहे.
    – जगाच्या पटावर कोणाचा कुणाशी कुठे कसा संबंध येईल, काहीं सांगतां येत नाहीं.
    स्नेहादरपूर्वक
    सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..