मुंग्यांच्या इवल्याशा शरीरात २ लाख ५० हजार मेंदू पेशी असतात. त्यामुळे मुंगी ही सर्वांत ‘स्मार्ट’ कीटक आहे. बुलेट अँटच्या चाव्यास सर्वात वेदनादायी मानले जाते, तर ‘जॅक जम्पर’ या जातीतील मुंगीचं चावणं हे अत्यंत घातक ठरू शकतं. मुंगी हा असा प्राणी आहे जो जगभरात सर्वत्र आढळतो. अंटार्क्टिका आणि काही मोजक्या बर्फाळ प्रदेशाला सोडून पृथ्वीवर सर्वत्र मिळणारा जीव म्हणजे मुंगी.
जगभरात मुंग्यांच्या तब्बल १२००० जाती आहेत. ०.०३ इंच पासून ते २ इंचापर्यंतच्या या मुंग्या विविध आकारांत दिसून येतात. सर्व मुंग्यांना जन्म देणारी राणी मुंगी ही ३० वर्षांपर्यंत जगते. हे आयुष्य इतर मुंग्यांपेक्षा १०० पटीने जास्त आहे. मुंग्यांच्या सर्वात मोठ्या वसाहतीला ‘सुपरकॉलनीज’ म्हणतात. हे मोठे वारूळ तब्बल ३७०० मैल लांब असू शकते.
यात जवळ जवळ १ अब्जपर्यंत. मुंग्या राहू शकतात. असं म्हटलं जातं की, मुंग्या त्यांच्या शरीराच्या सुमारे ५० पट जास्त वजन उचलण्यास सक्षम असतात, त्या चांगल्या धावपटूसुद्धा असतात. त्या प्रत्येक सेकंदाला ३ इंच एवढं धावू शकतात. माणसाने जर ही स्पीड पकडली, तर तो ताशी ५५ किलोमीटर एवढ्या वेगाने धावू शकेल.
Leave a Reply