मूर्ती समोरचा धूर
मना आवडे भरपूर
पण अंतरंगी चा अग्नी
राख करितो!!
धूर धूर तो वेगळा
नभातला असो वा चुलीचा
असे तो सुवासिक वा चितेचा
समाधान देई!!
अर्थ–
कोणास कोणती गोष्ट समाधान देऊन जाईल याचा काही नेम नसतो. कोणाला कोऱ्या पुस्तकांच्या पानांचा वास आवडतो, तर कोणाला भिंतींना लावलेल्या नव्या रंगाचा. कोण गाडीतल्या डिझेल च्या वासाने ताळ्यावर येतो तर कोणी प्रवास करताना येणाऱ्या केमिकल च्या उग्र वासाने. याचाच अर्थ कधी कधी सवय ही फार फरक पाडते आयुष्यात. कोणाला रोज फ़ुलं वेचताना येणाऱ्या त्या हलक्या सुगंधाचा वास प्रसन्न करतो तर कोणाला सकाळी उठल्यावर पहिले धूम्रपान करताना येणाऱ्या जळक्या श्वासाचा वास घेऊन समाधान मिळते.
चुलीवरच्या जेवणाचा खरपूस वास हा काही औरच आनंद देऊन जातो पण त्याच चुलीतली लाकडं जेव्हा एखाद्या चितेवर चढतात आणि पेट घेतात तेव्हा येणारा वासही कोणाला समाधान देऊन जातो. शेवटी शरीराला जी सवय आपण लावतो तिचाच स्वीकार आपले श्वास सुद्धा आत्मसात करतात. शेवटी सुवास घेऊन मन प्रसन्न करायचे की दुर्गंधीचा शरीरावर आणि पर्यायाने मनावर विपरीत परिणाम करून घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply