
श्वास, सामना, गारंबीचा बापू, सरीवर सरी, एक डाव भुताचा असे गाजलेले चित्रपट आणि ‘घाशीराम कोतवाल’ सारखी अजरामर नाटय़कृती संगीतबद्ध करणारे प्रयोगशील संगीतकार, प्रसिद्ध सतारवादक आणि अध्यापक भास्कर चंदावरकर यांनी रवीशंकर व त्याच्या पत्नी अन्नपुर्णा देवी यांच्याकडून त्यांनी सतारवादनाचं शिक्षण घेतलं.
त्यांचा जन्म १६ मार्च १९३६ रोजी झाला.चित्रपट आणि संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन करणा-या जगातल्या मोजक्या जाणकारांमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. त्यानंतर, त्यांना पश्चिमेकडचे संगीत खुणावू लागले होते. त्यामुळे टॉन द ल्यू, जोसेफ अँटोन रिडल आणि डिटर बॅच यांच्याकडून त्यांनी जॅझचे धडेही गिरवले होते. संगीतामध्ये अनेक नवनवीन प्रयोग त्यांनी केलं. विशेष म्हणजे मा.प्रभा मराठे यांच्या दोन नृत्य नाटिकांसाठी दोन तासांचं दिलेलं संगीत चांगलंच गाजलं. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटमध्ये त्यांनी १५ वर्षं संगीत प्रशिक्षक म्हणून काम केले.
एकीकडे विद्यादानाचे काम सुरू असतानाच, १९७० पासून मराठी रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करण्यासही त्यांनी सुरुवात केली होती. त्यापैकीच एक प्रयोग १९७२ मध्ये क्लिक झाला. विजय तेंडुलकरांच्या “घाशिराम कोतवाल’ ला त्यांनी दिलेले संगीत मराठी नाट्यरसिकांना भावले. आपोआपच चित्रपटांचा भव्य पडदा खुला झाल्याने मा.चंदावरकर यांच्या प्रयोगशील वृत्तीला बहरच आला.मराठी, हिंदीसोबतच, पाश्चात्य चित्रपटांच्या पार्श्वसंगीताची जबाबदारीही त्यांनी उत्साहाने उचलली आणि ती यशस्वीपणे पेलली होती.
संगीतकार म्हणून घाशीराम कोतवालच्या यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यानंतर त्यांचा सामना हा सिनेमा चांगलाच गाजला. सामना मधली त्यांची गाजलेली गाणी रसिक श्रोते कधीच विसरू शकणार नाहीत. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे याच सिनेमातले गाणे.
भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीताचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी जगभर व्याख्यानं दिली. मा.भास्कर चंदावरकर यांची संगीतातले उत्तम जाणकार, देशी वाण सांभाळणारा पण परदेशी संगीताची जाण असणारा संगीतकार म्हणून ओळख कायम राहणार आहे. अनेक भारतीय भाषांमधले सुमारे ४० चित्रपट भास्कर चंदावरकरांनी आपल्या संगीतानं सजवले. मृणाल सेनचा “खंडहर”,अपर्णा सेनचा “परोमा’, अमोल पालेकरांचा”थोडासा रुमानी हो जाए’, विजया मेहतांचा “रावसाहेब’, जब्बार पटेलांचा”सामना’, “सिंहासन’ तसेच “आक्रित’, “कैरी’, “मातीमाय’ हे त्यापैकी काही विशेष गाजलेले चित्रपट.
श्वास या चित्रपटासाठी चंदावरकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर संगीत नाटक अकादमी पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आले होते. घाशिराम कोतवाल ’ हे नाटक, ‘ सामना’, ‘ सिंहासन ’ सारखे चित्रपट अजरामर करण्यामध्ये मा.भास्कर चंदावरकर यांच्या संगीताचा अविभाज्य वाटा आहे. मा. भास्कर चंदावरकर यांचे २६ जुलै २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी संगीत दिलेली गाणी.
अजब सोहळा, ओंजळीत माझ्या माझे उसासे, कुणाच्या खांद्यावर, कंठ आणि आभाळ दाटून गाव ,असा नि माणसं अशी, घेऊन रूप माझे चांदणं टिपूर हलतो वारा, चांदोबा चांदोबा भागलास, डोळ्यांत वाकुन बघतोस, तूच मायबाप बंधू , पुंडलिका भेटी परब्रह्म, बंद ओठांनी निघाला, बांधले मी बांधले इंद्राचे तोरण, माय-बाप सेवा पवित्र, मी फसले ग फसले, विषवल्ली असुनी भवती, सख्या चला बागामधी, सख्या रे घायाळ मी, सांज आली दूरातून, सांज झाली तरी माथ्यावरी, हा दैवगतीचा फेरा.
https://youtu.be/dIXdC0hwcfk
Leave a Reply