औरंगाबाद येथे जन्मलेले इक्बाल कुरेशी यांना लहान पणापासून संगीताची आवड होती. औरंगाबाद सोडून ते हैद्राबाद येथे फाईन आर्ट अकॅडमीला नोकरीसाठी गेले. ती बदलीची नोकरी असल्याने ते मुंबईत आले. ६.४ इंच उंची असलेले मा.इक्बाल कुरेशी त्या काळी बॉलीवूड मधील एक भारदस्त व्यक्तिमत्व होते. इक्बाल कुरेशी यांचा यांचा संगीतकार म्हणून १९६० साली आलेला पहिला चित्रपट पंचायत,कि जो मनोज कुमार यांचा सुद्धा पहिला चित्रपट होता. फिल्मालयचा लव्ह इन सिमला या चित्रपटातील इक्बाल कुरेशी यांची सगळी गाणी गाजली. बिंदिया, ये दिल किसको दु, उमर केंद हे त्यांचे संगीत दिलेले इतर चित्रपट. मा.इक्बाल कुरेशी यांच्या वाट्याला “ब” अथवा “क” दर्जाचे निर्माते व दिग्दर्शक आले. परन्तु त्यातील काही गाणी खूप लोकप्रीय झाली होती. त्यांनी एकूण २८ चित्रपटाना संगीत दिले. इक्बाल कुरेशी यांचे २१ मार्च रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
इक्बाल कुरेशी यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=81z-a7IxSHY
Leave a Reply