संगीतसाधक पंडित श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर यांचा जन्म २७ मार्चला झाला.
गीत, संगीत, गायन, संवादिनी वादन, बंदिशींची निर्मिती अशी चौफेर कामगिरी करणारे ज्येष्ठ संगीततज्ज्ञ अप्पासाहेब इंदूरकर यांचे मूळ नाव श्रीधर. विदर्भाच्या सांगीतिक क्षेत्रात अत्यंत सन्मानजनक, गुरुतुल्य असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
अलाहाबाद बँकेत त्यांनी नोकरी केली व सोबतच संगीताचा छंदही त्यांनी जोपासला. संगीतावरची गाढ श्रद्धा आणि अजोड अभ्यास यांच्या जोरावर त्यांनी गायन, वादनात प्रावीण्य प्राप्त केले. गायन, तबला वादन, हार्मोनियम वादन, बंदिशींची निर्मिती, सुगम संगीताच्या रचनांची निर्मिती असे त्यांचे चौफेर कार्य त्यांनी केले. उस्ताद अमीर खाँ साहेबांचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव होता. त्यांच्या सुगम संगीतातील लालित्य व शास्त्रीय संगीतातील बौद्धिक बाजू अप्पासाहेबांनी सांभाळली.
संत ज्ञानेश्वरांच्या पसायदनाला त्यांनी दिलेली नवी चाल विशेष उल्लेखनीय ठरली. त्यांनी निर्मिलेल्या मधुप्रिया रागातील काही रचनाही प्रसिद्ध झाल्या आहेत.
१५ मार्च २०१९ रोजी अप्पासाहेब इंदुरीकर यांचे निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply