नवीन लेखन...

मट दिवस (Mutt Day)

पाळीव प्राण्यांमध्ये सगळ्यात जास्त पाळला जाणारा प्राणी हा कुत्रा आहे. तो खूप इमानदार प्राणी आहे ह्याबद्दल दुमत नाही. आपण त्याच्यावर जेवढं प्रेम करतो त्यापेक्षा दुपटीने तो आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. आपल्या मालकाची काळजी घेण्यात ह्या प्राण्याला कोणीही मागे टाकू शकत नाही. बरेच जण आपली श्रीमंती दाखवण्यासाठी , status symbol म्हणून कुत्र्याला पाळतात. पण हे सगळे पाळीव म्हणजेच घरगुती कुत्रांच्या नशीबात लिहिलेलं असतं. बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या म्हणजेच भटक्या कुत्रांच्या बाबतीत मात्र वेगळ्याच गोष्टी दिसून येतात. ते देखील तितकेच किंबहुना पाळीव कुत्र्यांपेक्षा जास्त हुशार , प्रेमळ आणि इमानी असतात. पण त्या बिचाऱ्यांना ते प्रेम , काळजी फार कमीच प्रमाणात मिळते. त्यांचे लाड , कोडकौतुक व्हावे म्हणून US (UNITED STATES) मध्ये ३१ जुलै व २ डिसेंबरला खास एक दिवस साजरा केला जातो. तो दिवस म्हणजे National Mutt Day / National Mixed Breed Day. Mutt म्हणजे दोन वेगळ्या जातीच्या संबंधातून निर्माण झालेली प्रजाती. मुळात ती मुद्दाम प्रस्थापित न केलेल्या पण सहज प्रस्थापित झालेल्या संबंधातून निर्माण झालेली प्रजाती असते.

हा दिवस मिश्र जातीच्या कुत्र्यांना वर्षातून दोनदा प्रेम करण्यासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करतो.

नवीन घराची इच्छा बाळगून, असे लाखो प्रेमळ आणि निरोगी मिश्रित कुत्री कुत्रे आहेत की जे कोणीतरी येऊन त्यांना दत्तक घेण्याची वाट पाहत आहेत.

हा दिवस आपल्याला एका परिपूर्ण कुत्र्याचा साथीदार शोधण्याची उत्कृष्ट संधी प्रदान करतो. एक Mutt शुद्ध जातीच्या प्राण्यांप्रमाणेच शिकतो, काळजी घेतो आणि प्रशिक्षणही घेतो. त्यांच्या वंशावळीचा शोध घेता येत नाही आणि त्यांची वैशिष्ट्ये थोडी अस्पष्ट असली तरी त्यांचा सहवास विश्वासू असतो.

एएसपीसीएच्या (American Society For The Prevention Of Cruelty To Animals )मते, दरवर्षी अंदाजे 3.3 दशलक्ष कुत्री आश्रयस्थानांमध्ये प्रवेश करतात. जेव्हा ते आश्रयस्थानात प्रवेश करतात तेव्हा प्रत्येकाला कायमचे घर हवे असते. आपल्याला हे माहित असले किंवा नसले तरी त्यांची क्षमता अमर्याद आहे. दत्तक घेण्याचे काही फायदे बहुतेक वेळा लपवले जातात. आपण धीर धरल्यास, चार पाय असलेले सहकारी विश्वास ठेवण्यास पात्र ठरतो आणि नवीन गोष्टी शिकतो. उदाहरणादाखल बोलायचं झाल्यास , कुत्रा मानवी जीवनशैलीचे अनेक वास शोधत असताना त्यांना प्रत्येकाचे शूज वेगळे असल्याचे आढळून येते.

मंडळी जसे आपण प्रेमाचे भुकेले असतो तसे ते ही कुणीतरी त्यांच्यावर प्रेम करावं ह्याची वाट पहात असतात. त्यांना आपल्याकडून फक्त प्रेम आणि आपुलकी ह्या दोन गोष्टींचीच गरज असते. जर आपण ह्या दोन गोष्टी त्यांच्यासाठी केल्या तर ते शेवटच्या श्वासापर्यंत आपली साथ देतात. एकवेळ संकटात आपले म्हणून मानलेले पाठ फिरवतील पण हा चार पायांचा माणूस तिथेही तुम्हाला साथ देईल. चला तर ह्या दिवसाचे औचित्य साधून एक तरी Mutt आपण दत्तक घेऊ. मला खात्री आहे की तो कधीच तुम्हाला नाराज करणार नाही आणि तुम्हीही कधीच त्याला विसरू शकणार नाही.

– आदित्य दि. संभूस

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..