नवीन लेखन...

माझं कीचन

My Kitchen

ओमीच लग्न झाल्यानंतर माझं कीचन पुर्ण बदललयं… युगेशाने त्याला पुर्ण मॉडर्न बनवलयं..!! बाहेर काम करुन घरी लवकर आली की कीचनमधे शीरुन काही ना काही बनवण्याची तीला हौस आहे.. पुर्वी मी वीळी घेऊन भरभर कांदा कापत होते पण आता तीने कांदा कापून द्यायच यंत्रही आणलयं.. खोबर खीसायचही…. खरच जेवण बनवणं कीती सोप्प झालयं! काही सासवा या सुधारणा स्वीकारत नाहीत… ” आमच्या वेळी नव्हते बाई असले नखरे..स्वतःच्या हातानी करायचो सगळी कामे .” अशी वाक्य फेकत विनाकारण सुनांना कमी लेखण्यातच त्या धन्यता मानतात… अरे असुदेत ना.. तुम्हाला नाही मीळालं तरुणपणात सुख म्हणून तर सुनांनीही घ्यायच नाही ? उलट तुम्ही सुध्दा त्याच्या बरोबरीने नवीन एंजोय करायचा प्रयत्न करा …. उद्या त्यांच्या सुना आल्या तर त्या आणखीन काहीतरी नवीन बदल करतीलच की… आपण जात सोडून पीठाच्या गीरणीकडे वळलोच ना? पाटा वरवंटा सोडून मीक्सरला आपलसं केलच ना? मग येऊदेत की विचारातही आणखीन बदल… स्वीकारा….त्या यंत्रांशी खेळण्यातपण एक मज्जा आहे.. ती घ्या आणि सुनेने कौतुकाने समोर आणलेला पास्ताही मनापासून खा ! मग बघा ती सुध्दा तुमची चपाती भाजीही कीती चवीने खातेय ते…माझी सुन खाते मी केलेल आवडीने … मीही स्विकारलीय तीच्या हातची वेगळी चव …

आपल्या मुलासाठी सुन स्वताला बदलवतच असते की मग आपल्या मुलासाठीच आपणही जरा बदललं तर त्याचाच संसार सुखाचा होईल… तेच तर हवं असत ना आईला??

माणसाने बदल स्वीकाराले की नाती सुदृढ होतात .!!

– वसुंधरा

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..