संक्रांतीच्या शुभेच्छा
इतक्या वारेमाप झाल्या
मोबाईलला माझ्या
काळ्या मुंग्या लागल्या
किती गोड किती गोड
दुर दुरून बोलतात माणसं
किती अगदी सहजपणे
जवळून दूर जातात माणसं
लांबचा वाटतो जवळचा
जवळचा काय कायमचा
कधीतरी येणाराच
सण असतो महत्वाचा
शुभेच्छा हव्यात कृतीत
नको नुसत्या उक्तीत
एकमेकांच्या असावं
प्रेमळपणानं संगतीत
मेसेज डिलीट करण्यातच
अख्खी संक्रांत गेली
मोबाईलची शु्गर लेवल
मात्र भलतीच वाढली
— WhatsApp वरुन
Leave a Reply