“हे माझे घर शब्दांचे”. लिम्का रेकॉर्ड २०१६ ह्यांनी नोंद घेतलेली एकमेव “स्वाक्षऱ्याची भिंत”. “सह्याजीराव – सतीश चाफेकर” – ह्यानी गेली ५० वर्षे स्वाक्षऱ्या गोळा करण्याचा छंद जोपासलेला आहे, आजमितीस त्यांच्याकडे १०००० हून अधिक स्वाक्षऱ्या आहेत. त्याचे मूर्त स्वरूप म्हणचेच “स्वाक्षरी संग्रहालय”
साधारणतः २००२ मध्ये मी डोबिवलीमधील टिळकनगर मध्ये दुसरा ब्लॉक घेतला. त्यावेळी माझा चित्रकार मित्र अमोल सराफ जो आता अमेरिकेत असून तेथे वेगवेळ्या प्रकारची चित्रे काढत आहे. त्याला सहज म्हणालो माझ्याकडे खूप स्वाक्षऱ्या आहेत त्यातील काही भितीवर काढशील का , एक दिवशी रंग, ब्रश घेऊन आला आणि जवळ जवळ ३५ तासात माझ्या घराच्या भितीवर स्वाक्षऱ्या अप्रतिमपणे रेखाटल्या.
पुढे काय ? असा प्रश्न मनात आला त्यावेळी बाजूच्या टिळक शाळेत कार्यक्रम चालू होते त्यावेळी डॉ. वसंत गोवारीकर आले होते. त्या कर्यकममध्ये माझे मित्र मोघे सर याचा हात होता, त्यांना विचारले डॉक्टर घरी येतील का स्वाक्षरी करण्यासाठी. त्यांनी त्यांना विचारले आणि ते आले. त्यांनी पहिली स्वाक्षरी भीतीवर केली. मला आठवतंय त्या वेळी मी स्टीफन हॉकिंग्जचा मोठा फोटो काढला होता तो त्यांना लॅमिनेट करून दिला, ते खुश झाले.
त्यानंतर सिलसिला सुरु झाला, त्यावेळी अनेकांनी मदत केली आजही करत आहेत. टिळकनगर गणेशउत्सव मंडळ असो, आमची पै फ्रेंड लायब्ररी असो अनेकजण मदत करतात कोणी प्रमुख पाहुणा आला की माझ्या स्वाक्षरीच्या भीतीवर स्वाक्षरी करण्यास आवजून घेऊन येतात.
आतापर्यंत 160 च्या वर सेलेब्रेटींनी स्वतः येऊन स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामध्ये कवी ग्रेस, डॉ रघुनाथ माशेलकर माशेलकर, डॉ विजय भटकर, निदा फाजली, गोविंदाचार्य , सचिन तेंडुलकरची आई रजनी तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, महेश काळे, प्रवीण दवणे, रवींद्र साठे , शिरीष कणेकर , महेश काळे , रवींद्र साठे, उत्तरा केळकर , निरंजन आणि अनुपमा उजगरे , शौनक अभिषेकी, वासुदेव कामत….
कामत सरानी स्वतः माझ्या भितीवर माझे अप्रतिम स्केच काढले आहे , बाबासाहेब पुरंदरे, शरद पोंक्षे, रवी जाधव, वसंत वसंत लिमये, सुरेंद्र चव्हाण, राजन भिसे , अतुल परचुरे , चंद्रकांत लिमये, आनंद भाटे, मुकुंद मराठे , उपेंद्र दाते , प्रवीण दवणे , आरती अंकलीकर , विठ्ठल कामत , अतुल परचुरे, वीरधवल खाडे , संजीव अभ्यंकर , क्रिकेटपटू जयंतीलाल, सुधीर वैद्य, द्वारकानाथ संझगिरी , प्रणव धनावडे , चेतन दातार , हुल्लड मुरदाबादी , मधू मंगेश कर्णिक , अनंत भावे , अरुणा ढेरे , उमा कुलकर्णी , सुनील मेहता , अशोक कोठावळे, अच्युत पालव , सदाशिवराव गोरक्षकर , मोहन जोशी, महेश काळे ,मनोज जोशी , सुदीप नगरकर .. जयतीर्थ मेवुंडी..
आज ते भारतातील पहिले असे घर आहे म्हणून त्या घराची २०१६ मध्ये लिम्का रेकॉर्डमध्ये नोंद झाली. नुसत्या सह्या मी घेतल्या नाही, काही विद्वान नावे ठेवतात. त्यात काय कर्तृत्व…. पण ते नसे नसते करून पहा राव. ह्यामुळे, या स्वाक्षरीच्या घरामुळे मला नवीन ओळख मिळाली हे महत्वाचे. आतापर्यंत लागोपाठ चार लिम्का रेकॉर्ड झाले असून ह्यावेळी पाचवा सलगपणे लिम्का रेकॉर्ड झालेला आहार आहे.
स्वाक्षऱ्या ह्या प्रत्यक्ष घेण्यात जी मजा आणि तो एक आठवणींचा ठेवा असतो आपल्या साठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी.
— सतीश चाफेकर
काही फोटो देत आहे..
Leave a Reply