‘तुला पाच पैश्याची किंमत नाही ‘ हे वाक्य आयुष्यात कितीदा ऐकले असेल याची नोंद नाही. घरी, बाहेर ,लहान.,थोर सर्वांची या बाबतीत एकवाक्यता मला आश्चर्यचकित करून जाते. जगणे कठीण झाले .म्हणून मग मी काय केले ?……
जगण्यासाठी एकदा मी माझाच लिलाव माडला,
सर्व अवयव विक्रीस ठेवले ,
रास्त किंमत ,भव्य डिस्कांउट,
एकावर एक फ्रीचे बॅनर लावले
आमची कोठेही शाखा नाही आवर्जून लिहिले
हात ,पाय ,कान,नाक,पाठ ,पोट
आकर्षक पॅकिंगमध्ये मांडून ठेवले,
“घ्या हो घ्या ,हवे ते घ्या ,
ज्यास्ती ज्यास्त बोली लावा “
लिलावाचा हॉल गच्च भरला,
लहान- थोर , गरीब-श्रीमंत ,
स्वकीय, ओळखीचे, अन अनोळखीही
माझ्या साठी आले,मन माझे भरून आले,
लिलाव सुरु झाला ,हाता-पायांचा ,
लाख,,,, दोन लाख,… बोली चढत होती ,
माझी किंमत मलाच काळात होती,
कमाल बोली स्वकीयांनीच लावली,
आश्चर्य वाटले. …………का?,
‘कष्टाला बरे आहेत म्हणाले!
शिवाय पाठ आणि खांदे डिस्कांउट मध्ये!’
नाक लांब, कान हलके, म्हणत सर्व अवयव खपले,
पण ,……………………..
पोट अन हृदय तसेच राहिले ,
फुकट पण कोणी घेईनात!
वेळ संपत आली ,हॉल रिकामा होत आला,
आता काय करू ? माझी तगमग सुरु झाली,
शेवटी …………………..
पोटातली भूक, अन हृदययातल मन उपसून काढले,
दोन्ही रिकामे अवयव भिरकावून दिले!,
भूक आणि मन स्वतःच मारून टाकले!,
मग मात्र जगायचं कस ते समजू लागले!.
सर्व अवयव विक्रीस ठेवले ,
रास्त किंमत ,भव्य डिस्कांउट,
एकावर एक फ्रीचे बॅनर लावले
आमची कोठेही शाखा नाही आवर्जून लिहिले
हात ,पाय ,कान,नाक,पाठ ,पोट
आकर्षक पॅकिंगमध्ये मांडून ठेवले,
“घ्या हो घ्या ,हवे ते घ्या ,
ज्यास्ती ज्यास्त बोली लावा “
लिलावाचा हॉल गच्च भरला,
लहान- थोर , गरीब-श्रीमंत ,
स्वकीय, ओळखीचे, अन अनोळखीही
माझ्या साठी आले,मन माझे भरून आले,
लिलाव सुरु झाला ,हाता-पायांचा ,
लाख,,,, दोन लाख,… बोली चढत होती ,
माझी किंमत मलाच काळात होती,
कमाल बोली स्वकीयांनीच लावली,
आश्चर्य वाटले. …………का?,
‘कष्टाला बरे आहेत म्हणाले!
शिवाय पाठ आणि खांदे डिस्कांउट मध्ये!’
नाक लांब, कान हलके, म्हणत सर्व अवयव खपले,
पण ,……………………..
पोट अन हृदय तसेच राहिले ,
फुकट पण कोणी घेईनात!
वेळ संपत आली ,हॉल रिकामा होत आला,
आता काय करू ? माझी तगमग सुरु झाली,
शेवटी …………………..
पोटातली भूक, अन हृदययातल मन उपसून काढले,
दोन्ही रिकामे अवयव भिरकावून दिले!,
भूक आणि मन स्वतःच मारून टाकले!,
मग मात्र जगायचं कस ते समजू लागले!.