गैरसमज : Whats app ,Facebook , Instagram, Telegram, etc. म्हणजे व्यसन आहे
माझे मत : स्वतःवर नियंत्रण असेल तर कोणतेच व्यसन लागू शकत नाही. शेवटी स्वतःवर संयम हवा. तो नसतो म्हणून Social Media ला नावे ठेवण्यात अर्थ नाही. दहा पावलावर प्रत्यक्षात परमिट रूम आहेत. मग सगळेच तिथे जातात का ? तसेच हे आहे. संतुलन ठेवले तर Social Media चा नकळत फायदाच होऊ शकतो.
गैरसमज : Social Media एक आभासी जग आहे.
माझे मत : Social Media आभासी असले तरी प्रयत्न केले तर ते जग प्रत्यक्ष जगात आणता येते. लोकांसाठी आपण नक्की काहीतरी करू शकतो. पुरावा देतो पहा. आम्ही एक उपक्रम राबविला होता ExamVishwa दत्तक योजना म्हणून आणि याची माहिती आम्ही Social Media च्या माध्यमातून दिली . परतेक जिल्ह्यात आमचे कोणतेच प्रतिनिधी नसतानाही विविध उपक्रम केले आणि विद्यार्थांना प्रेरित केले , काहींनी अभ्यासिका काढल्यात , काहींनी मोफत मार्गदर्शन शिबिरे काढलीत , बरेच चांगले लोक मिळालीत . मग याला काय आभासी म्हणायचे का ? तुम्हीच ठरवा
गैरसमज : Social Media पासून सावध रहा.
माझे मत : Social Media पासून सावध काय राहायचे ? तसे तर प्रत्यक्ष जीवनात देखील सावध रहावेच लागते न ! कुलूप न लावता घर सोडून जातो का आपण ? तसेच इथे लॉकिंग सिस्टीम व्यवस्थित ठेवली तर कोणी काही फसवत नाही. वाईट घडायचे तर ते जीवनात हि घडतेच कि ! मग फक्त Social Media च कसे जबाबदार ? शेवटी स्वतःवर आहे सगळे
गैरसमज : बरेच काही खोटे असते तिथे…. काहीच खरे नसते.
माझे मत : तसे तर जीवनात हि अशी मुखवट्याची माणसे भेटतातच की !! गोड बोलून फसवणूक करत नाहीत का ? खोटे बोलुन स्वार्थ साधत नाहीत का ? हे सगळे प्रत्यक्ष जगात घडते, पण म्हणून आपण जग सोडून जात नाही किवा जगाला नावे ठेवत नाही तर स्वतः मध्ये योग्य तो बदल करतो, आणि पुढे जातो. तसेच Social Media वर वागता, जगता येते. व्यक्तिश: माझी फसवणूक जशी प्रत्यक्ष जगात कोणी करत नाही, तसेच इथेही अनुभव आहेत. उगीच Fake Account च्या नावाने गळा काढून रडण्यापेक्षा तशी लोक ओळखणारी नजर आपण स्वतः तयार केली पाहिजे. आणि तसेही जन्मापासून मरणापर्यंत चिमटीत धरून नियती जे काही करते त्याला आपण जीवन म्हणतो. फसवणूक कुठे म्हणतो ? आपल्या मनात जे स्वप्न होते ते प्रत्यक्षात येतेच असे नाही.
गैरसमज : Social Media मुळे अभ्यास आणि काम धंद्याकडे दुर्लक्ष होते.
माझे मत : हे तर मुळीच मला मान्य नाही. वेळेचे सुयोग्य नियोजन केले तर सारे काही सांभाळून इथे येता येते. मी नाही का करत ? वेळ फिक्स करा, मनावर नियंत्रण ठेवा, मग पहा व्यवसाय / नोकरी सांभाळून देखील या अनोख्या जगात वावरता येते. लोकांना तर वाटते कि, काही माणसे कायम Social Media वरच असतात कि काय ? तरीही Social Media साठी वेळ काढता येतो. माझ्या सारख्या साध्या माणसाला हे जमते तर बाकीच्यांना काय अवघड आहे ? Enjoy You Life ……
गैरसमज : Time Pass असतो सगळा… इथे
माझे मत : काहीजण इथे त्या उद्देशाने येत असतील ही !! पण मी तसे कधीच केले नाही. उलट काम सतत करून किवा अभ्यास करून एक प्रकारचा आळस येतो, तो इथे आलो कि दूर होतो. मी रिफ्रेश होतो आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला किवा अभ्यासाला लागतो. जग काय करते इथे हे पाहून मत बनवण्या पेक्षा आपण काय करतो, हे पहिले तरी खूप झाले. नावे ठेवताना एक बोट समोर मात्र इतर तीन बोटे स्वतःकडे वळलेली असतात, हे विसरू नये माणसाने म्हणजे झाल ….
— प्रा. हितेशकुमार पटले
Leave a Reply