न बोलताही मन तुझे मला कळले
शब्दांचे सांग अर्थ कशास आता हवे
व्यक्त मी तुझ्यात हलकेच कधीच झाले
मनाचे चांदणे आल्हाद तेव्हा बहरले
न बोलताही भाव तुझा मज कळला
माझ्या अल्लडपणात मोह तुझा व्यापला
बोलतांना मी भाव अलगद बांधले
निःशब्द बोल तुझे भाव सांगून गेले
न बोलताही तू खूप काही बोलून गेला
अलवार स्पर्श तुझा अंतरात मोहरला
नजरेतील ओढ अलगद तुला कळली
मूक तुझी भाव कळी मोहक खुलली
शब्दांचे चांदणे अबोल का आज झाले
हृदयात सख्या मन कल्लोळ साचले
अव्यक्त तू व्यक्त मी शब्द कुणी छेडले
गंधाळल्या वाटेवर मी तुझ्यात हरवले
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply