( एका चित्रकाराच्या सरस्वतीच्या नग्नाविष्कारावरील तीव्र प्रतिक्रियेवर त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य भोक्ते सखे तुटून पडले . सरस्वती चितारताना अभिव्यक्तिस्वातंत्र्य असतं , मग सटॅनिक व्हर्सेसवर बंदी घालताना हे व्यक्तिस्वातंत्र्य कसं आड येत नाही ; आपल्या सामान्य बुद्धीला हे भेदभावाचं कोडं कधी सुटलंच नाही . )
तुमच्या नग्नतेला त्या संवेदना ; कुरवाळा सतत ‘ दुखणाऱ्या ‘ भावनांना रे
आमच्या वेदना , अब्रुचे धिंडवडे मग असे कसे स्वस्त का रे
आमच्या क्रूर निंदेचे वर्मी घाव , हे व्यक्तिस्वातंत्र्य तुम्हाला
तुमचे सत्य दोषदर्पणही अमान्य , होतो तो तुमच्या भावनांवर घाला
भावनांचा आमच्या , नियोजित बलात्कार न केवळ सहावा आम्ही
अपेक्षा तुमची ; ठेवूनी उघडे डोळे , हसराही चेहेरा ठेवावा आम्ही
चित्कारांचा उद्रेकही ना निसटावा चुकूनही,
वा अर्धवट शहाणे आक्रोशती होऊनी लाही लाही
सरस्वती भासते उघडी , अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे पारदर्शी वस्त्र लेवूनी
त्या वस्त्राचा होतो बुरखा काळा , दडविण्या ‘ सटानिकाला ‘ जादू होऊनी
एवढी प्रबळ असावी उर्मी तुम्हा , निर्मितीची , नग्नसत्याच्या आसक्तीतुनी
का न व्हावा विवस्त्र मुल्ला , वा त्यावरला , सुरुवात करुनी आपल्याच अंगणी
(Charity begins at Home ! )
सर्वधर्मसमभावाचा इथे पिटतो डंका , पुरोगामित्वाचे टिळे लावूनी
करुनी रामाला परागंदा , त्याच्याच भूमीत , शिव्यांची लाखोली वाहूनी
सहावा मार बुक्क्यांचा तोंड दाबूनी Secular तेच्या शिक्क्यापायी
घ्यावी काळजी आम्हीच तुमची , पुनः पुनः ठायी ठायी
न फुटावे तुमचे काचमन आमच्या दगडमनाच्या टवक्यांनी काही
दोन समाजमनांना अशी दोन हाती भेदभावी वागणूक का
लटलटणाऱ्या बोचऱ्या मानांना ना याची खंत , चिंता वा आशंका
निर्लज्ज बुध्दीवेड्यांची मग ‘ बुध्दीनिष्ठा ‘ गहाण पडून
सतत सुटते दुर्गंधी त्या निष्ठेला , विष्ठेहूनही कुजून
तुमच्याच शब्दास नसतो शाश्वततेच्या घडूताचा आधार
विश्वासार्हता झिरझिरते जीर्ण वस्त्रानी उभी फाटून जर्जर
कसा वहावा सच्च्या काळजांनी सहिष्णु भावनांचा भार
किती बाळगावा संयम , एकतर्फी विचारी , बंधुत्वाचा पदर
तुम्ही करता सतत चिंता फोफावणाऱ्या मूळतत्ववादी ‘ विष पिकाची
कुठे होती मग अक्कल तुमची ,
जेव्हा होता पेरत बीजे या कर्तुत्वहीन भेदनितीची !
–यतीन सामंत
Leave a Reply