आत्मा कोठे असतो,
नाभी केंद्रात शोधाल का ?
तो तर दिसत नसतो,
मग त्यास जाणाल का ?….१,
सर्व इंद्रिये वापरली,
परि न झाला बोध,
कोठे लपला आहे,
न लागे कुणा शोध….२,
विचार आणि भावना,
संबंध त्याचा ज्ञानाशी
मेंदूत आहे इंद्रिय,
संपर्क त्यांचा सर्वांशी….३,
मेंदूवरी ताबा असे,
नाभीतील मध्य बिंदूचा
समजून घ्या सारे,
तेथेच आत्मा देहाचा…४,
मातेचे अपूर्व देण,
बाळाच्या नाभीत जमते,
आत्मा हेच रूप,
जीवन कार्य चालविते…..५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply