मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला नागपूजन करण्यास शास्त्र सांगते. सर्वांना श्रावणातील नागपंचमी माहित आहे. या पंचमीकडे शहरात तरी दुर्लक्ष असते.
भारतीय संस्कृतीत मानवाला उपकारक पशु, पक्षी, कीटक वगैरेना देवत्व दिलेले आढळते. साप हा मानवाला उपकारक आहे तसाच त्याचा धाक सुद्धा आहे. आपल्यापेक्षा शक्तिशाली, बलवान गोष्टींची पूजा करणे हा मानवधर्म आजही पाहण्यास मिळतो. श्रावणातील नागपंचमी भारतीय ऋतुमानाप्रमाणे पावसात येते. तेव्हा शेतीची मशागत सुरु असते. तेथील नागपूजन शेतीचे रक्षण करावे, उपद्रव देऊ नये म्हणून असावे. मार्गशीर्ष महिन्यात पीक घरी आलेले असते. नागांची आपल्याला मदत झाली या कृतज्ञतेच्या भावनेने परत येथे नागपूजन आले असावे असे वाटते.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply