नाते प्रेममयी , विश्वासदायी, नाते जिवीच्या जिवलगी,
दाखवी आपुलकी,
नुरणे सलगी,–!!!
धागे मैत्रीचे, धागे जिव्हाळ्याचे, धागे आपुल्या सुसंवादाचे,
धागे सहकार्याचे,धागे अंतराचे
घट्ट विणी,–!!!
बंध रेशमी, नसावे तू अन् मी, द्वैतातून अद्वैत इतुकी एकी,
असे आत्मिक एकजिवी,
ठाम गोडी ,–!!!
परस्परा संकटी, एकमेका सहकारी, नसावी बिलकूल दुरी,
आपुल्या जीवनी,
अशी दोस्ती,–!!!
माझ्यात तू अन तुझ्यात मी,
प्रेमभरली गोडी,
दोस्ताच्या पुढे असशी,
मर्यादा राखून थोडी,
मैत्री जिवांची,–!!!
सुखदुःखे तुझी, सुखदुःखे माझी, आपली मानून झेलावी,
मान कापूनही द्यावी,
अगदी प्रसंगी,–!!!
हात न सुटती, असता “अडी-नडी,”
आड येत नाही, धर्म जात काही,
एकोप्याची भावना इतुकी,
दोघांत एकजिवी ,–!!!
प्रारब्धभोग दोन तनी,
संघर्ष मात्र एकतानी,
एकरूप जीव होती,
आपुली यारी,
आत्मिक मिलनी,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply