नवीन लेखन...

नाथ हा ‘सर्वांचा’

सत्तरच्या दशकातील गोष्ट आहे.. डाॅ. काशिनाथ घाणेकरांच्या नाटकाचे कोल्हापूरमध्ये सलग तीन दिवस प्रयोग होते. थिएटर होतं, केशवराव भोसले नाट्यगृह. डाॅक्टर उतरले होते, शशी जोशींच्या ‘बादशाही’ लाॅजमध्ये.

May be an image of 1 personडाॅक्टरांना सकाळी दूध आणि नाष्टा वेळेतच लागायचा, जराही उशीर झाला तर ते संतापायचे. त्या दिवशी त्यांना दूध व नाष्टा आणून देणाऱ्या पोऱ्याला उशीर झाला. तो डिश व दुधाचा ग्लास घेऊन रुममध्ये आला व ते टेबलवर ठेवले. डाॅक्टर भडकलेले होते, त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्या पोऱ्याच्या श्रीमुखात ठेवून दिली..

तो पोऱ्या गाल चोळत खाली जाऊन बसला. डाॅक्टर, त्यांचं सर्व आवरुन बाहेर पडले. जाताना त्यांनी त्या पोऱ्याला खाली एका कोपऱ्यात पुस्तक वाचत बसलेलं पाहिलं होतं. प्रयोग झाल्यानंतर शशी जोशीला त्यांनी सकाळी घडलेला प्रकार सांगितला आणि त्या पोऱ्याबद्दल चौकशी केली. तेव्हा डाॅक्टरांना समजले की, तो मुलगा जवळच्याच एका खेड्यातील होता. शिक्षण घेता घेता, घरखर्चाला हातभार म्हणून फावल्या वेळेत, ही लाॅजमधील नोकरी तो करीत होता.

डाॅक्टरांनी शशीला सांगितले, ‘या मुलाच्या शिक्षणासाठी जो काही खर्च लागेल, तो तू मला सांगत जा. ते पैसे देण्याची जबाबदारी माझी. डाॅक्टर जसं बोलले, तशी त्यांनी कृती केली. त्याची मॅट्रीक झाल्यानंतर शशीला सांगून, त्या लाॅजमधील नोकरीतून त्याला मुक्त करुन अभ्यासासाठी भाड्याने एका खोलीची डाॅक्टरांनी व्यवस्था केली. त्याचा काॅलेजचा संपूर्ण खर्च डाॅक्टरांनी केल्यानंतर तो मुलगा चांगल्या मार्कांनी, एम. ए. झाला. फक्त रंगमंचावरच नव्हे तर समाजातही ‘दातृत्वाचे आदर्श’ असणारे, डाॅक्टर काशिनाथ घाणेकर हे ‘देवमाणूस’ होते…

डाॅक्टरांनी त्यांच्या नाट्य कारकिर्दीत, दिवाळीच्या चार दिवसांतील प्रयोगांचं मानधनाचं पाकीट कधीही घरी नेलं नाही.. त्या पाकीटातील जी काही रक्कम असेल ती बॅकस्टेजवाल्यांना ‘दिवाळी’ म्हणून वाटून टाकलेली आहे.. अशी कृती करण्यासाठी लागतं… ते ‘मोठं मन’!..

डाॅक्टरांच्या एका प्रयोगात त्यांचा इस्त्रीवाला, प्रयोगाच्या आधीच त्याचं काम आटोपून गालावर हात धरुन बाजूला बसलेला होता. डाॅक्टरांनी त्याला विचारले, ‘काय होतंय तुला?’ त्याने दाढ दुखत असल्याचं सांगितलं. डाॅक्टरांनी चुना तंबाखू् हातावर मळून त्यांची गोळी केली व त्याच्या दुखणाऱ्या दाढेवर दाबून, ती तशीच धरुन ठेवायला सांगितली. पहिला अंक झाल्यानंतर त्या इस्त्रीवाल्याला डाॅक्टरांनी बोलावलं व छोट्या पकडीने त्यांची दाढ उपटून काढली व त्याला वेदनामुक्त केलं.. डाॅक्टर, बीडीएस पदवीचे गोल्ड मेडॅलिस्ट होते, हे फार कमी जणांना माहिती आहे…

डाॅक्टर एखादे नवीन नाटक स्वीकारायचे तेव्हा, त्या नाटकाच्या पंचवीस प्रयोगांचे मानधन आगाऊ घ्यायचे. त्या मिळालेल्या रकमेतून ते चांदीचे ताट, वाटी, तांब्या असा सेट खरेदी करायचे.डाॅक्टर एखादे नवीन नाटक स्वीकारायचे तेव्हा, त्या नाटकाच्या पंचवीस प्रयोगांचे मानधन आगाऊ घ्यायचे. त्या मिळालेल्या रकमेतून ते चांदीचे ताट, वाटी, तांब्या असा सेट खरेदी करायचे.. असे अनेक सेट त्यांच्या हयातीत, घरी जमा झालेले होते..

त्यांच्या नाटकाच्या तिकीट विक्रीची संधी मिळविण्यासाठी बुकींग क्लार्कमध्ये चढाओढ लागायची. ते वाद न करता आपापसात ठरवून बुकींगला बसायचे.. त्याचं कारण असं होतं की, चार दिवसांचं बुकीगचं काम, चार तासांतच संपून जायचं. नऊ वाजता बुकींग सुरु व्हायचं, त्यासाठी प्रेक्षक पहाटे सहा वाजल्यापासून रांगेत उभे रहायचे. बारा वाजेपर्यंत ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लावला जायचा.. आणि त्या बुकींग क्लार्कला चार दिवसाचं मानधन तीन तासांतच मिळायचं…

आता या कोरोनामुळे नाट्य व्यवसाय ठप्प झालाय.. त्यामुळे डाॅक्टरांच्या या सत्यकथा, दंतकथा वाटू लागल्या आहेत… या गोष्टींचे साक्षीदार, सुबोध गुरूजींनी मला या सांगितल्या म्हणून, त्या मी आपल्यापर्यंत पोहचवल्या…

‘नटसम्राट’ अनेक झाले, रंगमंच’सम्राट’ फक्त एकच… ..आणि डाॅक्टर काशिनाथ घाणेकर!!!

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

१-९-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..