नभांगणी मेघ जमू लागले,
बघतां बघतां, बरसू लागले, तुझ्यासाठी रे नयन,
असे सतत तरसू लागले,–!!!
धरणी संजीवनात नहाते,
अंगांग तिचे जसे भिजे,
प्रेमवर्षावी तुझ्या बघ,
पंचप्राण तसे आसुसले,–!!!
वाऱ्यावादळांनी होई जसे, रोमांचित तन धरणीचे,
तसेच तुझे येणे भास
कणकण उठती शहाऱ्यांचे-!!!
धरणीचे स्वरूपच हिरवे,
तरो -ताजेपण तिचे,
काया होत टवटवीत,
तसेच हिरवेपण भरले,–!!!
माझे स्त्रीत्व,; तुझे येणे,
तुझे माझे एकरूप होणे,
धरणीचे पावसात भिजणे,
मग तिला राहील काय उणे,–?
उपजही जशी बदले,
धरणी कृतार्थ किती रे,
तिचे लेकुरवाळेपण
बनते जणू परिपक्व रे,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply