निरोगी आरोग्यासाठी शरीराच्या स्वच्छतेसोबत हातांची आणि हातासोबत नखांची विशेष स्वच्छता करणे गरजेचे आहे. नखांमध्ये साचणार्या घाणीमुळे अनेक आजार होऊ शकतात. नखातील मळ अन्नपदार्थाच्याद्वारे आपल्या शरीरात जाऊन त्याचे आपल्याला अपाय होतात. यासाठी नखे नियमित स्वच्छ करावीत. नखांची अवाजवी वाढ ही आज-काल फॅशन मानली जात असली तरी ती आरोग्यासाठी धोकादायक आहे. यासाठी वाढलेली नखे लगेचच काढावीत. हात धुताना नखांची चांगली स्वच्छता करावी. जेवण्यापूर्वी किंवा कोणताही खाद्यपदार्थ हातात घेण्यापूर्वी हात नखांपासून स्वच्छ धुवावेत. नखंवर कोणतेही पॉलिशिंग रंग, चकमक आदी आर्टिफिशल्स शक्यतो वापरू नयेत. पोटाचे व आतड्याचे आजार इन्फेक्शन आदींपासून बचाव होतो.
About सौ. निलीमा प्रधान
24 Articles
सौ. निलीमा प्रधान या खाद्यसंस्कृती, वास्तुशास्त्र आणि इतर अनेक विषयांवर लेखन करतात.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply