का ? या प्रश्नाचे नेहमीच उत्तर सापडत नसते. तसे मनोजकुमार का आवडत होता याचे उत्तर पण मला सापडत नाही . मी मनोजकुमारचे सिनिमे जसे आवर्जून पहिले तसे इतर कोणत्याही नटाचे सिनिमे मुद्दाम हून नाही पहिले . आज हि मी youtube वर त्याचे सिनेमा/ गाणी पहातो . ती मला पुन्हा त्या काळात घेवून जातात ! काल ‘ वह कोन थी ‘ मधल —नैना बरसे ,रिमझिम ,रिमझिम हे गाण ऐकल !क्षणात पन्नास वर्ष , मागे ओढला गेलो !आणि –“पिया तोरे आवन कि आस –“हि साद कोणीतरी मलाच घालत असल्याचा भास झाला !
लता मंगेशकरचा आवाज मदन मोहनच्या संगीतात अफलातून बहरतो , याचे हे गाणे एक उत्तम उदाहरण आहे . या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळची एक आठवण सांगितली जाते . सिमल्यात चित्रीकरण ठरले होते . सगळी व्यवस्था झाली होती . पण –पण गाणेच तयार नव्हते ! गाण्याचे ध्वनीमुद्रण होवू शकले नव्हते , कारण लाताजींचा घसा खराब होता . त्या गावू शकणार नव्हत्या ! मदन मोहनजीनी मनात आणाल असत तर कोणतीही गायिका घेता आली असती . पण त्यांना लता मंगेशकरच हवी होती !(का ? ते गाण ऐकल्यावर आपल्याला हि पटते ! इतरांच्या आवाजात हे गाण इम्याजिन नाही करता येत . )मग या वर उपाय काय ? तर मदनजीनी हे गाण स्वतः च्या आवाजात रेकोर्ड केल ! गाण्याच शुटींग पार पडल . नंतर मग लाताजीनी ते गायलं . आणि ते सिनेमात मदनजीच्या गाण्याला रिप्लेस केले . या गाण्यात मनोज कुमारने कुठेही त्याची स्टाईलवाला तो बोट फाकावलेला हात चेहऱ्या समोर धरलेला नाही हा गमतीचा भाग आहे !
लताजीनी हे गाणं खूप बहारदारपणे गायलंय यात वादच नाही . पण मी जेव्हा मदन मोहनचा आवाजातली क्लिप ऐकली तेव्हा ते मला खूप भावलं . लताजी पेक्षाही गाण्यातल्या भावना मदन मोहनच्या आवाजात ज्यास्त गहिऱ्या वाटल्या !(youtube वर उपलब्ध आहे )
हे गाणं एक ‘ भूत ‘ गातंय असं सिनेमात दाखवलाय . लता मंगेशकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवशीच्या कार्यक्रमात त्या गमतीने म्हणाल्या कि त्यांनी ‘ भूता ‘ची गाणी खूप गायली आहेत . त्यांनी गायलेली आणि मला माहित असलेली काही ‘ भूता ‘ची गाणी –आयेगा आनेवाले —-(महल ), तू जहाँ ,जहाँ चलेगा (मेरा साय ),कही दीप जले ,कही दिल —(बीस साल बाद ), गुम नाम है कोई —(गुमनाम )
साधारण दोन वर्षा नन्तर ‘ वह कोन थी ? ‘ चा तामिळ रिमेक निघाला होता . त्यात हे गाणे पी . सुशीला यांनी लता मंगेशकरांच्या तोडीस तोड गायलंय ! थोडी सवड कढून रसिकांनी जरूर स्वाद घ्यावा .
या सिनेमाची प्रेरणा एका ब्रिटिश नाटका वरून घेतली आहे ! The Woman In White हे त्या नाटकाचे नाव ! आणि नाटककार -Wilkie Collins . शम्भर वर्षा पूर्वीच्या कलाकृतीवरी सिनेमा !
माझी आवड आपल्याला आवडेल अशी आशा आहे .
— सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .