मी निराश झालो आहे ।।
खाचखळग्यांतून, दगडधोंड्यातून
पराभवाच्या अपमानातून
शल्य मनातले मनातच ठेवून
त्यातून वाट शोधत आहे ॥
मी निराश झालो आहे ॥ १ ॥
आत्मविश्वास तो गडबडे
ताबा अन् मनावरचा उडे
येथेच अडकून घोडे पडे
दुःख चावरे त्याचे मला आहे ॥
मी निराश झालो आहे ॥ २ ॥
प्रवास माझा पहाटे धवल यशाच्या
धुक्याचे पटल मध्येच नि हे वारे झोंबरे
मन माझे थरथरणारे
ही काजळी पुसू पाहे ॥
मी निराश झालो आहे ॥ ३ ॥
— यतीन सामंत
Leave a Reply