नवीन लेखन...

नैसर्गिक पूरक उपचार

आपल्याकडे एक अत्यंत वाईट गोष्ट असते. ती म्हणजे प्रत्येक जण ज्येष्ठ नागरिक उठसूठ डॉक्टरकडे धावत असतो. डॉक्टर औषध देतो. परंतु आपणास काय होते, हे पाहण्याकरिता थोडा वेळ थांबावे. घरातील वडील माणसे अथवा इतर लोक काही तरी तक्रारी सांगतात. हेच उदाहरण म्हणजे रात्री झोपतेवेळी पाणी अजिबात पीत नाही आणि हेच पायात गोळे अथवा वळ येण्याचे कारण होते. माणसाला पाणी फार आवश्यक असते. परंतु विशेषतः मुले व मुली पाणी फार कमी पितात. कारण आपल्याला रोज किमान सहा ते आठ मोठे ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. कारण आपल्याला पोटॅशियम आणि कॅल्शियमची कमतरता असते. कधी कधी आपल्या तळपायापासूनच गोळे येतात व भीती निर्माण होते.

याचेही कारण एकच आपण झोपताना पाणी फारच कमी पितो. संबंध दिवसात प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने दररोज किमान सहा ते आठ मोठे ग्लास पाणी प्यावे, असा आयुर्वेदात नियम आहे. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम अथवा योग्य शिक्षण घेणे आवश्यक आहे. उगाचच हातवार करणे अथवा पायावर उड्या मारणे, हे प्रकृतीला घातक असते.

शक्य असल्यास झोपताना गरम कपडे पायाखाली ठेवावे.

जर नेहमी पायात गोळे येत असल्यास खालील प्रयोग करून बघावा.

१. गोळा येत असल्यास पायावर सरळ भिंतीपासून दूर उभे रहावे.

२. भिंतीला उभे राहिल्यावर भिंतीला टेकून पायाच्या टाचा वर करून साधारण २ मिनिटे उभे रहावे. टाचा थोडे वर खाली कराव्यात. हे फक्त काही सेकंदच करावा. हे एकदा अथवा दोन वेळा करावे व मग झोपी जावे.

३. सकाळी उठल्यावर हाच व्यायाम एक अथवा दोनदा करावा. तसेच झोपण्यास जाताना अशाच करण्याने झोप चांगली लागते व गोळे थांबतात.

वर सांगितल्याप्रमाणे पायात गोळे येणे, याचाच अर्थ आपल्यात कॅल्शियम कमी पडते. हेच कारण पुरुषांपेक्षा बायकांना कॅल्शियमचे प्रमाण फारच कमी पडते. हा ॲस्टीओस्पोरोसीसचा त्रास संभवतो. याचे कारण आपल्याकडे कॅल्शियम शिवाय पोटॅशियमही कमी पडते. रोज सकाळी न्याहारी करताना चार चांगल्या प्रकारचे बदाम कोमट पाण्यात भिजवून ते सोलून खावे. तसेच दूध पिण्याच्या आधी रात्री झोपताना दूध गरम करून एका ताटलीत त्यात गरम पाणी घालून झाकण ठेवावे. त्यांनी मुंग्या येणार नाहीत. सकाळी न्यायाहीच्या आधी दुधावरची संपूर्ण साय काढून टाकावी मग ते पिण्यास देणे. तसेच बदामाबरोबर एक हिरव्या सालीचे केळे नियमाने खावे. कारण तुमच्या जेवणात तुमचे खाणेही कमी पडत असेल. दुपारी जेवताना शक्य तो मांसाहारी जेवण घेऊ नये. कारण विशेषतः बोकडाचे मांस खाल्ल्याने कोलेस्ट्रेरॉल एकदम वाढते. तसेच मासे खाल्ल्यास त्याचे बांगडे, सुरमई प्रकार खाऊ नये. कारण त्यात माशातील तेल फार असते. ज्येष्ठ नागरिकाचे जेवण अगदी साधे तसेच पौष्टीकही असावे. जेवताना सकाळी सूप घेतले ते तर लिव्हर अथवा पाया वगैरे सूप कधीच घेऊ नये कारण ते घातकच असते.

सूप साधारणपणे रात्री जेवल्यावर घ्यावे. साधारण टोमॅटो अथवा इतर हिरवीगार पालेभाज्यांचा समावेश असावा. या भाज्या म्हणजे पालक मेथी अथवा ढोबळी मिरचीसारखे अवश्य घ्यावी. ढोबळी मिरचीचे सूपही फारच पौष्टिक असते. हल्ली मुंबईमधील ड्रमस्टीक नावाचे हॉटेल आहे जेथे शेवगाच्या शेंगाचे सूप अतिशय चवदार असते. त्यात पावाचे तुकडे करून ते तेलात तळून चांगले लागते. आपणही असा प्रयोग अवश्य करावा आणि नियमित केल्यास पाय दुखण्याचे एकदम थांबतात. आवळ्याचे सरबत रोज दुपारी नियमाने घेतल्यास फार पौष्टीक असते आणि पाय दुखत असेल तर रात्री झोपताना एक ग्लास पाणी यात अर्धा चमचा कॅल्शियम लॅक्टेट तसेच एक चमचा मध घालून घ्यावे, हे औषध चार दिवस करून पाहिल्यास मात्र डॉक्टरांना दाखविणे इष्ट.

-श्री. मदन देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..