गणपतीला दुपारचा नैवेद्य अगदी साग्र संगीत असतो. नाव देवाचे आणि नैवेद्याचे ताट जेवतो आपणच.
पण रात्रीचं काय ? सायंपूजेला गणेशजींना काय नैवेद्य दाखवला जातो ? पुनः फुल्ल राईसप्लेट ?
नाऽही.
फक्त एक लाडू किंवा एखादा मोदक किंवा एक करंजी किंवा जास्तीत जास्त वाटीभर दूध.
“बास्स,
हे लंबोदरा, सायंपूजेला तुला एवढंच मिळणार !
आमच्या घराण्याच्या चालीरितीत असेच आहे.”
.
.
.
. आणि असं प्रत्येक घरात सुरू आहे.
जेव्हा या परंपरा सुरू झाल्या, तेव्हा पासून ते आजमिती पर्यंत यात काहीही बदल झालेला नाही. संध्याकाळी नैवेद्य हा अगदी मोजकाच असतो. ही भारतीय परंपरा असून, मागील फक्त तीस चाळीस वर्षात आपण बदललो.
जेव्हा पासून मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण झाले, घराघरात दूरदर्शन आणि नंतर केबल नंतर डिश बसली, त्यानंतर…..
देवाच्या नावाने सुरू असलेली एक चांगली आरोग्य परंपरा आपण विसरत गेलो.
जे जे देवासाठी ते ते देहासाठी ,
या नियमातही काही बदल संभवू शकत नाही. हे त्रिकालाबाधीत सत्य देखील आम्ही नाकारले.
आणि ते अर्धसत्य बनवले.
म्हणजे देवासाठीचा दुपारचा नैवेद्य पूर्ण ताट भर आणि रात्रीच्या वेळी फक्त वाटीभर.
नैवेद्याची प्रथा तीच ठेवली, पण त्यामागील आरोग्यशास्त्र आणि व्यवहार यांची सांगड घालणे आम्हाला जमले नाही. सायंपूजेला
देवाला जरी वाटीभर दिले तरी आम्ही मात्र ताटभर खाणे सुरू ठेवले.
नैवेद्य दाखवण्यातील ज्ञानमार्गाचा मूळ अर्थ बदलूनच गेला आणि फक्त आंधळी आणि सोयीस्कर भक्तीचे केवळ कर्मकांड शिल्लक राहिले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
08.09.2016
Leave a Reply