कुठुन कुठुन नजरा जातात
शिरत राहतात
अंग बघायला
बायांनीही फँशन म्हणून ठेवलेले असतात
पाठीवर
हातावर
कधी छातीवरही
काही झरोके
ब्लाॅउज अन साडीच्या
मधला भागही शोधत राहते
अन
मोठाच बलात्कार करत असते नजर
एकही अंग उघडं नसलेल्या
अंगभर कपडे घातलेल्या बाईवर
ब्रा वा इतर अंतर्वस्त्राचे किनार वा काठ
ठळक दिसत राहतात त्याला वरुन कपड्यावरुन….
तेव्हा !
— श्रीकांत पेटकर
Leave a Reply