नक्कीच कुणाततरी हरवावं!
नक्कीच कुणी तरी आवडून जावं!
नक्कीच कुणाच्या आठवणीत रहावं!
नक्कीच कुणाच्या मनात मिटून जावं!
नक्कीच कुणाच्या हृदयात राहावं!
नक्कीच कुणाच्या प्रेमात पडावं…
आयुष्य क्षणभंगुर आहे…आज आहे पण उद्याच कुणी बघितलं आहे!! राग यावा तसा लोभ असावा…. माया, ममता, जिव्हाळा जीवनात अंतरी ठेवावा…प्रेम तर सुखद, सुंदर भावना नक्कीच तिच्या, त्याच्या प्रेमात पडावं…तिच्या बोलण्यात, लाजण्यात, स्वरात,शब्दांत, हास्यात मधुर भावनेच्या ओल्याव्यात नक्कीच प्रेम करावं… आज मी आहे उद्या असेल का ? हे प्रत्येक व्यक्ती बाबत सत्य आहे….!
कुणाशी 2 शब्द आपुलकीने बोला, त्यात प्रेम असतं.. कुणाचं भरभरुन कौतुक करा त्यात प्रेम असतं… कुणाची निखळ तारीफ करा त्यात प्रेम असतं…. नाजूक कळीवर प्रेम करा…सुंदर फुलांवर प्रेम करा… उधाणलेल्या सागरावर प्रेम करा… कोसळणाऱ्या धबधब्यावर प्रेम करा… गंधित फुलांवर प्रेम करा.. माणसांवर प्रेम करा.. निसर्गाने मुक्त उधळण केली आहे..
त्या सगळ्यावर प्रेम करा… मनुष्य जन्म दुर्मिळ असा मग राग नकोच तर प्रेमाचा गंध हवा…
केलं तर प्रेम आहे आणि तेच सुंदर आहे….!
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply