नक्कीचं_उजाडेल..!
पृथ्वीच्या आसाभोवती सूर्य उगवतो रोजचं नव्याने, नवी स्वप्न उरी घेऊन, तर काहींच्या खांद्यावर जबाबदारीचं भलं मोठं ओझं देऊन जातो न मागता…!
जर आपण रांदत असू पायवाट आपल्याच वेदनेची, तर आपण आपल्याच पदस्पर्शाने मानवी संस्कृतीच्या पायवाटेवर उमटवतं आहोत येणारा भीषण काळोख…!
या भयाण महायुद्धात सहभागी नसलेल्या कित्येक निष्पापीतांच्या पोटावर घाव होत आहेत दिवसेंदिवस…
ज्या बोलघेवड्या वीरांच्या भुलथापावर विश्वास होता आपला, शंखनादाच्या अगोदरच त्यांनीचं तलवारी म्यान केल्यात म्हणे…
दिवस-रात्र अपल्याभोवती काळोख वेटाळा घालत असताना…
या गोंधळातील पांढरे ठिपके मात्र जराही विचलित नव्हती..! या वेदनेच्या मुखी अंतर्गत कितीही शंका असल्या तरी…!
बुध्दीहिनं मनाच्या डोहात कुठेतरी निसर्गाचे हृदय गंभीर जखमी केले जातयं आपल्याच कपटी माणसांकडून.
पृथ्वीला माय आणि आभाळाला बाप मानणारी आपली संस्कृती आज पिळवटून काढली जातेय नैतिकतेच्या चरख्यातून..!
आयुष्याच्या चिंतनांनी वेढलेल्या गर्दीच्या भोवती फिरत असताना एखाद्याला मनाचा एकांत सापडतो. हा ‘अलग’पणा जाणवत नाही का तुम्हाला..? नसेल जाणवतं तरी भोगावा लागेलचं, आपल्याच अंगणातील वटवृक्षाची फळे आहेत ते..!
एखादा साहसी नाविक त्याच्या आयुष्यात चिरत असले कितीतरी समुद्राच्या लाटा, म्हणून काय समुद्र जिंकता येत असतो का..? अंधार पाहणं आणि अंधार भेदणं या विलासी मानवी मनाच्या वेगळ्या अवस्था असतात, नाही का..?
जो समस्यांनी वेढलेल्या डोंगराच्या शिखरावर स्मितहास्य कोरेल, त्याच्यावर शोक करणारा दगड कुठे सापडेल का..? आणि विशेष म्हणजे तोही विस्थापितांच्या पायथ्यालगतचा नसेल तरं…!
आपण अनेक शंकासुराच्या काटेरी कुंपणातुन गेलो आहोतचं, पण थोडे आपले बोल असत्याच्या चौकातून सत्याच्या मार्गाकडे रममाण झाले तर थोडं लवकर नक्कीच उजाडेल…!
© अनिलराव जगन्नाथ
Leave a Reply