नको राजसा अंत पाहू ,
डोळे वाटेकडे लागले,
किती रात्रंदिन साहू ,
विरहव्यथेने तळमळले,–!!!
अजून नाही आलास तू ,
संजीवनही आता संपले,
कोरडा होईल ना रे ऋतू ,
जरी हिरवेपण ते दाटले,–!!!
अंगप्रत्यंगी चिंब भिजू ,
स्वप्न डोळियांनी पाहिले,
तव स्पर्शाची जादू ,–
तनमन किती लालसावले,–!!!
मिलन आपुले किती योजू ,
दिन – रात कमी पडले,
अपार ते प्रेम लुटू,
काळजांचे धागे विणले,–!!!
प्रीत मुसमुसतांना तू ,
जवळ हवा, मज वाटले,
नवथर आपुली जोड
लाजरी कळी बघ उमले,–!!!
शहारते आज तनू ,
कल्पनेचे तिला हिंदोळे,
प्रियाला लागे कवटाळू ,
एकांताची वाट चाले,–!!!
सुगंध लागे दरवळू ,
प्रेमप्रीत कशी हाकारे ,
तू असा दूर की परंतू ,
जिवाला वेधही लागले,–!!!
© हिमगौरी कर्वे .
Leave a Reply