वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात घराचे स्वप्न गरीबांच्याच नाही, तर मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेर गेले आहे. मागणी खूप आणि पुरवठा कमी; त्यामुळे जिथे मिळेल, जशी मिळेल तशी जागा घ्या अशी आज परिस्थिती आहे.
वाढते शहरीकरण, जागांची कमतरता, गगनाला भिडणारे भाव यात सुंदर घराचे स्वप्न कुठल्या कुठे वाहून गेलं आहे. आणि या स्वप्नांना ‘थ्री बीएचके’, ‘टू बीएचके’, ‘वन बीएचके’, आणि नुसताच ‘एचके’ असे आचके बसत आहेत.
पूर्वी गृहकर्जे आणि इतरही कर्जे सहज मिळत नसत किंवा मिळाली तरी फार तुटपुंजी मिळत. आता ती मिळणे सुलभ झाले असले तरी कर्जाचा विळखा जबर असतो. ‘घी देखा लेकिन बडगा नही देखा’ अशी गत असते. बिल्डर, आर्किटेक्ट, इंजिनीयर, ठेकेदार, राजकारणी, नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायती, कलेक्टर, तहसीलदार, स्टॅपड्युटी, वकील, एजंट, बँका, नगररचना कार्यालय, ऑफिस, प्राधिकरणे यांच्या टोळधाडीच्या तडाख्यातून कसा बसा श्वास घेणारे गिऱ्हाईक हतबल होऊन तथाकथित वास्तुतज्ज्ञं, वास्तुज्योतिषी यांच्या मायाजालात कधी फसतो याचा नेम नसतो. ही सर्व मंडळी आपापली वसुली यथास्थित करून घेतात.
मित्रांनो, हे एवढे प्रास्ताविक तुमचा हिरमोड व्हावा म्हणून नाही, तर तुम्ही ग्राहक आहात आणि जसा इतर माल खरेदी करताना पारखून घेता, तसे आयुष्यात बहुधा एकदाच करावयाची ही खरेदी करताना शंभर वेळा विचार करून करावी हा इशारा द्यावासा वाटतो.
अशी खरेदी करताना काय खबरदारी घ्यायची ते पाहू.
* आपली प्रथम तपासा. आपल्या कुटुंबाच्या गरजा ध्यानात घ्या.
* आपली आर्थिक क्षमता तपासा. तुम्ही कर्ज घेणार
* पुन्हा पुन्हा हे सांगावेसे वाटते की, सर्व सोंगे आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. हे पक्के ध्यानात ठेवा. पुढे-मागे बघू असे म्हणाल तर फसणार हे नक्की! कधीही आवाक्याबाहेर जाऊ नका. त्यामुळे घरात सुखशांती कधीही नांदणार नाही. आणि अशाच वेळी तथाकथित वास्तुतज्ज्ञ, वास्तुज्योतिषी यांनी लावलेल्या दुसऱ्या सापळ्यात उंदीर फसतो. मूळ रोगावर (पैशाची तरतूद) इलाज करण्याऐवजी त्याचे खापर वास्तुदोष म्हणून कशावर तरी फोडले जाते. ‘मन चंगा तो कटोतींमे गंगा’ हे आपण विसरतो.
*आपल्याला साधे, स्वच्छ, हवेशीर घर हवे आहे. घराचे मुख्यतः चार भाग असतात. बैठकीची खोली, स्वयंपाकघर, झोपायच्या खोल्या आणि स्वच्छतागृहे. कुटुंबाच्या आकारमानानुसार रा आर्थिक क्षमतेनुसार यांचे आकारमान कमी-जास्त असू शकते. महापालिका, नगरपालिका यांच्या सर्व सूचना एक मार्गदर्शन म्हणून आहेत, त्याप्रमाणेच सगळ्या इमारती असतील असे नाही. कारण ते सर्व बिल्डर आणि त्यांचे आर्किटेक्ट यांच्या हातात असते; परंतु काही गोष्टींची जुजबी माहिती असावी.
जिने आणि उद्वाहने: हा इमारतीचा खूप महत्त्वाचा भाग असतो. त्यांचे प्रवेश दालन प्रशस्त असावे. अंधार बोळ नसावा. आग लागल्यावर किंवा संकटकाळी त्वरित बाहेरच्या मोकळ्या जागेत जाता आले पाहिजे, असे असावे. थोड्या जागेत जिना बसविण्याच्या खटाटोपात काही ठिकाणी त्रिकोणी आकाराच्या पायऱ्यांचा (ज्यांना बांधकामाच्या भाषेत वाइंडर्स म्हणतात) वापर केला जातो, ते अयोग्य आहे. त्यामुळे दोन पायऱ्यांच्या शिड्यांमधील मोकळी जागा (लँडिंग स्पेस) निम्मी कमी होते. शिवाय उतरताना अडथळा येतो. नाइलाज असेल तर कमीत कमी दोन असाव्या, एक कधीही असू नये. जिना आणि उद्वाहनाच्या जागेतही माफक हवा आणि उजेड असावा. अलीकडे उंच उंच इमारतींची क्रेझ वाढत आहे. यात फायदा फक्त विकासकाचा असतो, कारण त्याला तेच ते साचेबंद काम ठोकबंद पद्धतीने सोयीचे असते. तो स्वतः तिथे राहणार नसतो. अशा इमारतींना लागणारी उद्वाहने हायस्पीडची लागतात. त्यांचा देखभाल खर्च, वीज वापर फार असतो. हा खर्च कसा वाटून घ्यायचा हा नेहमी वादाचा मुद्दा असतो. वीजपुरवठा खंडित झाला तर (तसा तो वरचे वर होतोच) फार त्रास होतो. पर्यायी वीजपुरवठा खर्चिक असतो. या सगळ्याचा विचार करता अतिउंच इमारतींमध्ये (सात मजल्यांच्या वरच्या) जागा घेणे टाळावे. अतिउंचावर राहणे कित्येक वेळा मानसिक तणावाचेही ठरू शकते.
इमारतींच्या सांडपाण्याचा, मलनिःसारणाचा निचरा, पाणीपुरवठा, देखभाल, सुरक्षा इ.साठी काय तरतूद आहे ते पाहा. आधुनिक सोयी-सुविधांमुळे कृत्रिम हवा (पंखे, ए.सी.), उजेड (विजेचे दिवे) भरपूर मिळण्याची सोय असली तरी ते फुकट नसते. विजेचे बिल जोराचा झटका देऊ शकते. त्यामुळे असा वापर कमीत कमी करण्याच्या हेतूने प्रत्येक खोलीत नैसर्गिक हवा, उजेड मिळतो की नाही ते जरूर तपासा. प्रत्येक निवासी खोलीत एक तरी असल्यास किती घेऊ शकता? ते फेडणार कसे? किती वर्षांचा आराखडा आहे? कर्जाव्यतिरिक्त इतर काही मार्गांनी पैसे उभारू शकता का व किती? एकदा हा आढावा घेतल्यावर आपले बजेट निश्चित करून जागा शोधायला लागा. इथे हेही लक्षात घ्या की कर्ज काढून खरेदी केल्यावर जागेचा ताबा मिळाल्यावर फक्त कर्जाचा हप्ताच भरावा लागणार नसून, घराचा ताबा घेतल्या क्षणापासून मेंटेनन्स चार्जेसही (महिन्याला) भरावे लागणार आहेत. आणि तो आकडा काही हजारांच्या घरात असणार आहे. शिवाय राहाती जागा सोडून, नव्या ठिकाणी बिऱ्हाड करताना शाळा, ऑफिस, मार्केट, रेल्वे, बस, दवाखाना, टॅक्सी, रिक्षा, दूध, वाणी अशा एक ना अनेक गोष्टींसाठी जादा पैशांची सोय करावी लागणार आहे, हे हिशोबात घेणे जरूर आहे.
* बऱ्याच योजनांमध्ये मोकळी हवा, निसर्गसान्निध्य, पंचतारांकित सुखसोयी इ.ची लयलूट दाखविलेली असते. आकर्षक रंगीत मोठमोठ्या जाहिराती, गुळगुळीत रंगीत छापील माहितीपत्रे, पेपरमध्ये पानभर मोठमोठ्या जाहिराती असतात. पण या भूलभुलैयात फसू नका. एक लक्षात घ्या की कोणत्याही सुखसोयी फुकटात नसतात. पंचतारांकित हॉटेलांना त्या परवडतात. कारण त्यांच्या एकेका सूटचे भाडेच दिवसाला वीस-पंचवीस हजार किंवा जास्तही असते. तेव्हा या शुद्ध थापा तरी असतात किंवा महिन्याला जबर मेंटेनन्सचा बडगा हाणणाऱ्या तरी असतात. बरेच ठिकाणी एखाद्या कोपऱ्यात भिंग घेऊनच वाचता येईल इतक्या बारीक अक्षरात, ‘या सुखसोयी आणि चित्रे’ ही कलाकाराची कल्पना असून त्या बदलू किंवा रद्द होऊ शकतात. ही जाहिरात आहे कायदेशीर कागदपत्रे नव्हे’ अशी मखलाशी केलेली असते. अशा बऱ्याच योजनांमध्ये पर्यावरण, नगररचना, सांडपाणी -मलनिस्सारण, वीज, पाणीपुरवठा, रस्ते इ.चा अभ्यासच केला जात नाही. किंवा त्यांच्या तरतुदी धाब्यावर बसविल्या जातात. नियमबाह्य कामे केली जातात. आणि एकदा पैसे गुंतवून बसलेला परिंदा फक्त पंख फडकवत बसण्यापलीकडे काही करू शकत नाही. त्यामुळे स्वस्तात मिळते, मोठे मिळते म्हणून घरापासून, कामाच्या ठिकाणापासून लांब घर घेताना या सर्व सुखसोयींसाठी किती दामाजींची सोय करावी लागेल याचा विचार आधीच करा. तुम्हाला गळाला लावून बिल्डर, विकासक अशा स्कीम वर्षानुवर्षे रखडत ठेवू शकतो. कोर्ट कचेऱ्या झाल्या तर त्याचा तो व्यवसायच असल्यामुळे आणि आधीच पैसे हडप केलेले असल्यामुळे तो निश्चिंत असतो. तुम्ही मात्र स्वतःचा कामधंदा सांभाळून या प्रकरणात स्वतःचे आणि कुटुंबियांचेही स्वास्थ्य गमावून बसाल. नशीबाने जिंकलात तरी ऐन उमेदीचे आयुष्य, आयुष्याची अनमोल वर्ष, कटुस्मृती निर्माण करण्यात खर्ची घालाल.
* थोडे जास्त पैसे पडले तरी एखाद्या तयार स्कीममध्ये म्हणजे रेडी पझेशन किंवा वर्ष/सहा महिन्यात तेही खात्रीने तयार होणाऱ्या योजनेत बुकिंग योग्य वाटते. बांधकाम एजन्सीची ख्यातीही विचारात घ्या. नियमांनुसार त्यांचे कमीतकमी आकारमान कायदेशीरपणे निर्धारित केलेले असते. त्यापेक्षा ते कमी चालत नाही. नकाशे मंजूर करताना ते तपासले जाते. बैठकीची खोली, स्वयंपाकघर आणि स्वच्छतागृह एवढे तरी कमीतकमी प्रत्येक घरात असावेच लागते. झोपायच्या खोल्या, स्वच्छतागृहे एकापेक्षा अनेकही असू शकतात. आर्थिक क्षमतेनुसार या सर्व घटकांचे क्षेत्रफळ संख्या वाढू शकते. आता प्रत्येक घटकाचा थोडक्यात वापर पाहू.
बैठकीची खोली: सर्वात जास्त वापरला जाणारा घरातला भाग. इथे पूर नसला तरी माफक तरी असावा. फार मोठ्या काचेच्या खिडक्या, दरवाजे शक्य तो टाळावेत. त्यासाठी पड तर लागतातच, पण सुरक्षिततेसाठी लोखंडी जाळ्या, दारेही लागतात. चित्रात हे दाखवले जात नाही म्हणून ती चित्रे छान छान दिसतात, पण रोजच्या वापरासाठी गृहिणींची मोठी डोकेदुखी होऊन बसतात. चार ते पाच फूट उंचीच्या खिडक्या पुरेशा असतात.
स्वयंपाकघर: छोटेसे असले तरी चालते, पण इथेही माफक उजेड आणि हवा पाहिजेच. एखादी तीन-चार फूट उंचीची खिडकी पुरेशी होते.
स्वच्छतागृह: अंधारे, कोंदट, एखाद्या बोळकांडीवजा जागेतून हवा, उजेड येणारे नसावे. खिडकीबाहेरच्या मोकळ्या जागेमध्ये (OPEN SPACE) उघडली जावी.
झोपण्याची खोली: आपल्या आवडीनुसार पण माफक उजेड, हवा आवश्यक. फार मोठ्या काचेच्या खिडक्या-दारे आणि समोर बाल्कनी असेल तर चालतील, परंतु एरवी नसलेली बरी, बॉक्स टाइप बांधकामामुळे खर्च वाढतो तो तुमच्याच खिशातून वसूल होतो. छज्जे किंवा कॅनोपी प्रोजेक्शन दक्षिण आणि पश्चिम बाजूकडील खिडक्यांवर कमीत कमी · दीड दोन फूट तरी असावे. त्यापेक्षा जास्त उत्तम! कारण या बाजूंकडून ऊन आणि पावसाचा जास्तीत जास्त मारा होत असतो. इमारतीच्या दक्षिण आणि पश्चिम बाजू उर्वरित बाजूंपेक्षा लवकर खराब होतात, याचे आपण निरीक्षण करू शकता. उत्तरेकडून प्रत्यक्ष सूर्यप्रकाश जरी फार कमी मिळतो तरी या बाजूकडून दिवसभर ऊन-पावसाच्या मायाशिवाय फार चांगला प्रकाश ज्याला ‘स्काय लाइट’ म्हणतात तो मिळतो. त्यामुळे या बाजूवर मोठमोठ्या खिडक्या-दारे असायला हरकत नाही. जुन्या काळी जेव्हा प्रकाशाची साधने फार कमी होती; तेव्हा आर्ट स्टुडिओ, फॅक्टरी इ.साठी नॉर्थ लाइटच्या मोठमोठ्या खिडक्या वापरल्या जात. आजही आपण तसे वापरू शकतो. या बाजूकडील खिडक्या- दरवाजांवरही पाणी अडवण्यासाठी छोटेसे का होईना पण प्रोजेक्शन आवश्यक असते. उंच उंच टॉवर्स बांधले जातात, त्याच्या भिंती बाहेरून सपाट करण्याची एक अनिष्ट प्रथा पडल्याचे दिसते. त्यामुळे पावसाचे पाणी संपूर्ण भिंतीवर पसरून प्रत्येक मजल्याच्या तुळया आणि भिंती या मधल्या फटीत मुरून आतमध्ये शिरण्याचा धोका वाढतो. आतमधून ओल येते. भिंती खराब ा होतात. ते टाळण्यासाठी प्रत्येक मजल्याच्या पातळीवर न इमारतीच्या चारी बाजूंनी बाहेर येईल असे काँक्रीटचे प्रोजेक्शन वजा पट्टा असल्यास फार उत्तम. अर्थात, या खिडकी, झरोका नव्हे, बाहेरच्या खुल्या मोकळ्या जागेकडे उघडणारी असलीच पाहिजे. तिचे कमीत कमी क्षेत्रफळ खोलीच्या क्षेत्रफळानुसार किती असावे याचे नियम असतात (साधारण दहा टक्के) आणि नकाशे भंजूर करताना ते तपासलेही जाते; परंतु जागेच्या वाढत्या किमतीचा विचार करता आणि इंच इंच जागेचा विक्रीचा भाव लक्षात घेता एखादा इंचही न सोडण्याच्या हव्यासापायी या नियमातून पळवाटा काढणारे किंवा अनियमिते, अवैध कामे करणारे खूप व्यावसायिक, बिल्डर, अधिकारी, कर्मचारी, दलाल इ. असतात. त्यामुळे काही शंका आल्यास तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.
* एखाद्या स्कीममध्ये जागा घेताना तसे आपल्या हातात काही फारसे नसतेच. आणि एखाद दुसऱ्या गिऱ्हाईकासाठी कोणी काही मोठे फेरफार करणार नाही. शेवटी गरजवंताला अक्कल नसते आणि सध्याच्या घरखरेदीच्या पद्धतीनुसार फारशी निवडही नसते. तरीही अगदीच अंधारात उडी मारू नये म्हणून या सावधगिरीच्या सूचना.
आपण जिथे जागा घेणार आहोत ती आणि तिथले वातावरण आपल्या जीवनपद्धतीला योग्य आहे का, याचा विचार. छोटी जागा घेऊ, पण हाय फाय सोसायटीत, एरियात घेऊ, हा विचार चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे कुटुंबीयांच्या आणि मुलाबाळांच्या अपेक्षाही वाढत जातात आणि मर्यादित आर्थिक परिस्थितीत त्या पुऱ्या करणे जमले नाही तर कोंडीत सापडल्यासारखी गत होते. आपल्या नोकरी -व्यवसायाचे स्वरूप आणि त्यात नजीकच्या भविष्यकाळात होऊ शकणारे चढउतार आणि आर्थिक ताळेबंद ही फार महत्त्वाची बाब आहे. घाईघाईने,अविचाराने खरेदी करण्याची ही गोष्ट नव्हे, एवढे ध्यानात घ्या.
* जागा घेताना वास्तूचे निव्वळ बाह्य सौंदर्य पाहू नका. त्यात गिऱ्हाईकांना भुलविण्यासाठी अनावश्यक गोष्टींचा वापर केला जातो. उदाहरणार्थ जुन्या ब्रिटिशकालीन, पाश्चात्त्य भव्य इमारतींची भ्रष्ट नक्कल करणारे खांब, तुळया, कमानी, नक्षीकाम, पुतळे इ. इ. त्या काळात इमारती मुख्यतः दगडी किंवा विटांच्या जाड भिंतींच्या (कमीत कमी जाडी दीड फूट) असत. त्यामुळे त्यांची रचनाही वेगळी असे. त्यात अशा प्रकारचे दिखाऊ काम शक्य होत असे. आता होते ती फक्त भ्रष्ट नक्कल असते, फक्त नाटक-सिनेमाच्या पडद्यांप्रमाणे किंवा सेटप्रमाणे खोटे काम असते. त्याचा इमारतीच्या बांधकामाशी काहीही संबंध नसतो. अर्थात, हे सगळे खोटे आणि दिखाऊ असल्यामुळे कालांतराने त्याची देखभाल, डागडुजी, रंगरंगोटी हा एक फालतू खर्चाचा बोजा असतो. तो गिऱ्हाईकांच्याच माथी बसतो. एखादे पंचतारांकित हॉटेल, शॉपिंग सेंटर, मॉल, थिएटर इ. व्यापारी इमारतींना ते परवडू शकेल, पण मर्यादित उत्पन्नाची ते साधने असणाऱ्यांना हा पांढरा हत्ती कसा पोसायचा ही जटिल समस्या होऊ शकते. नाकापेक्षा मोती जड व अशा या तथाकथित हायफाय इमारतींपासून दूर र राहणेच योग्य.
— वि. रा. अत्रे
मुख्य वास्तुशास्त्रज्ञ (निवृत्त), महाराष्ट्र शासन
Leave a Reply