जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग १०३
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ५९
नमस्कारानंतर करायची प्रार्थना.
या पूजेमधे माझे काही चुकले असेल तर देवा मला क्षमा कर. क्षमा मागण्यात कोणताही कमीपणा नाही. प्रत्येक धर्मात या प्रार्थना आहेत. प्रार्थनेमधे मोठी शक्ती आहे. सामुहिक प्रार्थनेत तर आणखी जास्त शक्ती मिळते. येथे शक्ती हा शब्द शब्दशः अर्थाने वापरायचा नाही.
एकत्र येऊन केलेल्या मागण्या आणि वैयक्तिक केलेली मागणी यात व्यवहारात देखील फरक पडतोच ना ! समुहामधे ताकद आहे. संघामधे शक्ती आहे. संघ म्हणजे एकसंघपणा. आताच लाखो लोकांनी एकत्रितपणे काढलेल्या रॅलीमधील एकसंघपणा ही ताकद आहे.
“मला देतोस का नाही,”
“मला पण इतरांसारखे दे.”
आणि
“मलाच का देतोस, इतरांना का नाही.”
या तीन प्रार्थना जर तिघांनी केल्या तर कोणाला मनापासून द्यावेसे वाटेल. ?
या प्रार्थनेत क्रमशः तम रज आणि सत्व गुण ओळखता येतात. अर्थातच जे सत्त्व गुणी ते उत्तम.
प्लीज प्रे फाॅर मी, मेरे लिए दुवा करो । असं इतर धर्मात सांगितले जाते. पण हिंदु धर्मात मात्र, आपण बरं आपलं काम बरं, प्रत्येकाच्या घरी देवघर असल्याचा तो परिणाम असेल. इतर धर्मात घराघरात देव नाहीत. जे देव आहेत, ते त्यांच्या प्रार्थनाघरात ! बघा त्यांच्या देवळाला पण “प्रार्थनाघर” असेच म्हणतात. एवढे प्रार्थनेला महत्त्व आहे.
आपल्याकडे सुद्धा प्रार्थना सांगितलेली आहे. माऊलींचे पसायदान हे मागणे ही पण एक प्रार्थनाच आहे. “हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा” हे मागणे तुकोबारायांचे. तर “सदा सर्वदा योग तुझा घडावा” ही प्रार्थना समर्थ रामदास स्वामींची ! “सर्वऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः !” ही पण एक प्रार्थनाच !
सर्वांचे मागणे एकच. सर्वांचे कल्याण व्हावे. दुःखी कोणी असू नये.
किती मोठी भावना आहे ही !
हात जोडून, ह्रदयापासून केलेली प्रार्थना “तो” ऐकतो, असे सर्वच धर्मातील संत सांगतात.
याचा अर्थ “तो” आहे, यावर सर्वांचा विश्वास आहे. फक्त भारतातील काही जणांनाच ” तो ” नाही, असे वाटते. याला आपण तरी काय करणार? असो. तर प्रार्थना करावी. न लाजता करावी. मला प्रपंचातील काही तरी मिळावे म्हणून नको तर, माझ्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व वासना, इच्छाच नाहीश्या कर म्हणून मागणे मागावे.
आता या प्रार्थनेत, मागण्यांमधे आयुर्वेद कुठे दिसला ? आयुर्वेद म्हणजे काय फक्त पाळेमुळे विकणारे वाटतात की काय ? जीवनाचा वेद आहे. आयुष्याचे शास्त्र आहे. समष्टी साधना आहे. आयुर्वेद म्हणजे येऱ्या गबाळ्याचे काम नाही.
सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट होऊन ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य, शांती आणि सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त होवो हीच दीप अमावस्येला परमेश्वर चरणी प्रार्थना.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
२३.०७.२०१७
आजची आरोग्यटीप
Leave a Reply