दलित चळवळीमधले ज्येष्ठ नेते, कवी, लेखक, कादंबरीकार नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी झाला.
नामदेव लक्ष्मण ढसाळ हे कवी, लेखक, कादंबरीकार आणि नाटककार अशा विविध पैलूंनी प्रसिद्ध असणारे दलित चळवळीमधले ज्येष्ठ नेते. मुंबईतल्या अत्यंत गरीब आणि बकाल भागात बालपण घालवल्याने त्यांनी दारिद्र्य आणि ससेहोलपट जवळून पाहिली आणि आपल्या विशिष्ट भाषेतून त्यांनी ते दलितांचं आयुष्य शब्दबद्ध केलं.
एकीकडे ‘दलित पँथर’सारख्या उग्रवादी चळवळीतून जहाल आंदोलनं करत त्यांनी विद्रोही कविता आणि लेख लिहिणं चालू ठेवलं होतं. चिंध्यांची देवी आणि इतर कविता, गोलपिठा, हाडकी हाडवळा, गांडू बगीचा, खेळ, मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे!, निर्वाणा अगोदरची पीडा, सर्व काही समष्टीसाठी, या सत्तेत जीव रमत नाही, तुझे बोट धरुनी चाललो आहे मी, आंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट, तुही यत्ता कंची? तुही यत्ता…, दलित पँथर एक संघर्ष, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे १५ जानेवारी २९०१४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply