अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारले तो दिवस, अश्विन कृष्ण चतुर्दशीचा होता.
नरकासुराने मृत्यूपूर्वी वर मागितला की अश्विन कृष्ण चतुर्दशीला म्हणजेच नरक चतुर्दशीला जो मंगलस्नान, अभ्यंगस्नान करेल त्याला नरकयातना होऊ नयेत. भगवंतांनी “तथास्तु” म्हटले. म्हणून या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करतात.
नरक चतुर्दशी आणि भाऊबीज या दोन दिवशी अपमृत्यू होऊ नये म्हणून पिता असणार्यांनी पाण्यात अक्षता घालून व पिता नसणार्यांनी पाण्यात तीळ घालून यमतर्पण करावे.
ती दहा नांवे अशी –
१) यमंतर्पयामि २) धर्मराजं ३) मृत्यूं ४) अंतकं ५) वैवस्वतं ६) कालं ७) सर्वभूतक्षयकरं ८) औदुंबरं ९) दध्नं १०) नीलं ११) परमेष्ठिनं १२) वृकोदरं १३) चित्रं १४) चित्रगुप्तं.
या तर्पणानंतर दक्षिण दिशेला तोंड करुन स्लोक दहा वेळा म्हणावा – “यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च काल: । भूताधिपतो दत्त कृतानुसारी कृतांत एतद्दशभिर्जंपति ।।
— विद्याधर करंदीकर
Leave a Reply