नवीन लेखन...

नारायण भंडारीचं काय झालं ? भाग १

।। सोमि सिरीज : भाग १।।

तो धावत होता .
ऊर फुटेस्तोवर धावत होता .
दिशाहीन . तहानभूक विसरून .
अगदी सकाळपासून .

– कुणीतरी त्याला बसथांब्यावरच्या भल्यामोठ्या फ्लेक्सचा फोटो पाठवला होता . व्हॉट्सअपवर .
फ्लेक्स चा फोटो बघून तो हादरला होता .
अविश्वासाच्या नजरेनं तो पुन्हा पुन्हा पहात होता .

थोड्या वेळाने आणखी काही ग्रुप्सवरून त्याच प्रकारच्या फ्लेक्सचे फोटो त्याच्या स्क्रीनवर येऊ लागले . शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे .
फ्लेक्सचा साईझ तोच .
फोटो तोच .
कॅप्शन तीच .
नारायण भंडारीचं काय झालं …?

त्याच्या लक्षात आलं .
काहीतरी गडबड झाली आहे .
त्याचं नाव , त्याचा फोटो वापरून कुणीतरी जबरदस्त धमाका उडवून दिला होता .

पण का ?
कशाकरता ?

शहरातील असंख्य नागरिकांना तोच प्रश्न पडला होता .
कदाचित मालिका , मुव्ही , वेबसिरीज ची ही जाहिरात असावी , असा विचार करून नागरिकांनी घड्याळाच्या काट्यावर धावायला सुरुवात केली होती .

पण तो मात्र धावत होता .
ऊर फुटेस्तोवर धावत होता .

अचानक तो थांबला .
समोर काटेरी तारेचं कुंपण होतं .
त्याच्या आत भली मोठी केळीची बाग होती .
त्या कुंपणाच्या आत चार क्रूर कुत्रे होते .
त्यांच्या डोळ्यातून आग आणि तोंडातून लाळ गळत होती .
वखवखलेली जीभ स्पष्ट दिसत होती …

त्याच्या लक्षात आलं .
आठ दिवसांपूर्वी तो अनावधानानं इथंच आला होता .
अगदी अनपेक्षितपणे .

अंधार पडायला सुरुवात झाली होती .
पाणी प्यायला म्हणून तो थांबला .
ते ठिकाण हेच होतं .

फार्महाऊसचा लाईट दिसल्यानं , गाडी साईड स्टँडला लावून तो पुढं आला .
कुणाचीतरी हालचाल दिसल्यानं तो हाक मारायला पुढं झाला .
आणि समोर अंधारात नजर रोखून बघताच त्याला जे दिसलं त्यामुळं तो पुरता हादरून गेला .
त्याच्या घशाला कोरड पडली .
पण त्याही स्थितीत त्यानं मोबाईलवर फोटो काढला .
आणि तिथेच घात झाला .
फ्लॅशमुळं आतल्यांचं लक्ष गेलं .
आणि ते सगळे आणि कुत्रे त्याच्या दिशेनं येऊ लागले .
आपलं मरण ओळखून तो बाईककडे धावला आणि बाईक शहराच्या दिशेनं पळवली .

बऱ्याच वेळानं त्याचा श्वास नियमित झाला .
गाडी थांबवून त्यानं मोबाईलवरचा फोटो पाहिला .
आणि पुन्हा तो हादरला .
काही गुंड कुत्र्यांना काहीतरी खायला घालत होते .
त्यानं नीट निरखून पाहिलं .
वीतदीडवीत उंचीची लहान लहान हाडं..

हे काहीतरी भयानक आहे , हे त्याच्या लक्षात आलं .
तो तसाच सुसाट सुटला आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये शिरला.
पोलिसांना त्यानं मोबाईलवरचा फोटो दाखवला .
पोलिसांनी गोड बोलून त्याचा मोबाईल हाती घेतला आणि पटकन फोटो डिलीट केला .

…आणि सुजल्या चेहऱ्यानं , फाटलेल्या कापड्यानिशी तो कसाबसा बाहेर आला .
मोठ्या कष्टानं बाईक सुरू केली आणि घराच्या रस्त्याला लागला.

घरी आल्यावर त्यानं पुन्हा मोबाईल बघितला .
त्याच्या सुदैवानं अजून एक फोटो शिल्लक होता .
त्यानं मागचा पुढचा विचार न करता फोटो व्हायरल करायला सुरुवात केली .

– आणि न्यूज चॅनल्सचा टीआरपी प्रचंड वाढू लागला .

फोटो कुणी काढला हे नाव लपून राहणं शक्यच नव्हतं .
सायबर सेलनं आपलं काम अचूक केलं .

आणि त्या दिवसापासून नारायण धावू लागला .
ऊर फुटेस्तोवर धावू लागला .
धावता धावता तो विचार करत होता .
तो मळा कुणाचा ?
ते गुंड कुणाचे ?
ते कुत्रे कुणाचे ?
आणि ती वीतभर उंचीची हाडं कुणाची होती ?

त्याला प्रश्नांची उत्तरं काही मिळाली नाहीत .

पण अशी उत्तरं शोधण्यासाठी , अनैतिक , बेकायदेशीर असं जिथे जे काही जाणवेल ते शोधण्यासाठी तो सगळ्यांच्या अगोदर तो पोचू लागला .

– पण आज कहर झाला होता .
सगळीकडे त्याचे फ्लेक्स लागले होते .
आणि तो ऊर फुटेस्तोवर धावू लागला होता …!
( क्रमशः )

(नारायण भंडारी या नावासह पूर्णतः काल्पनिक . यातील घटना प्रसंगाचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही , तसा कुणाला आढळला तर तो योगायोग समजावा .)

— डॉ. श्रीकृष्ण जोशी

ही सोमि सिरीज ( सोशल मीडिया सिरीज ) नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 118 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..