कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..
घरातले चांगले संस्कार, कुटुंबातील लोकांचे प्रेम, मैत्रिणीच्या आणाभाका, स्वत:चीच स्वप्ने, सारे सारे झुगारून वारंवार त्याच चुका करायला भाग पाडणारे ते व्यसनाचे वेडेपणाचे आकर्षण कसे स्वतः सोबतच कुटुंबातील लोकांचे नुकसान करते याचा प्रवास म्हणजे नशायात्रा..
मनोरुग्णालय, फूटपाथवर वास्तव्य, व शेवटी कारागृह अशा वळणांवरुन शेवटी थांबलेला दारूण व थरारक प्रवास म्हणजे नशायात्रा..
तुषार नातू यांच्या `नशायात्रा’ या पुस्तकावर आधारित हे सदर आता नियमितपणे आपल्या भेटीला येतेय.. फक्त आपल्या `मराठीसृष्टी’वर !
Leave a Reply