नवीन लेखन...

मिशन फेल …! (नशायात्रा – भाग १९ )

(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)


मटक्याचा अड्डा जाळण्याची आमची मानसिक तयारी पूर्ण झालेली होती व आम्ही एकून १५ लिटर रॉकेल देखील आणून एका ठिकाणी लपवून ठेवले होते . या मिशन साठी आम्ही शनिवार ची रात्र निवडली होती . ठरल्याप्रमाणे एक जण तेथील परिसराची रेकी करून आला होता बाजूच्या झोपड्या आणि हा अड्डा यात जास्त अंतर नव्हते त्यामुळे कदाचित बाजूच्या झोपड्या पेट घेऊ शकतील हा धोका होता मग त्यावरून आमच्यात वाद झाले की आपण जसे त्या मटक्याच्या अद्द्यावरच्या माणसाला वाचवण्याचा विचार करतोय , तसेच बाजूच्या झोपड्यांच्या बाबतीत काही करता येईल का ? खूप चर्चा झाली एक गट म्हणत होता की फार तर एखादी झोपडी पेटेल व आपणच तिथे आसपास लपून आगीचे निरीक्षण करायचे व अड्ड्या व्यक्तीरिक्त जर दुसरी काही पेटले तर ताबडतोब आरडा ओरडा करून आग विझवायची अर्थात यात एक धोका होता की आम्हाला त्या जागेवर थांबावे लागणार होते व त्यामुळे कदाचित नंतर तपासात आमचा संशय येण्याचा धोका होता त्या मुळे आमच्यातील दुसऱ्या गटाचे असे म्हणणे पडले की त्या बाजूच्या झोपडयांचा जास्त विचार न करता सरळ आपले काम उरकून घरी निघून जावे काय होईल ते होईल . पण दुसरा पर्याय जरा अमानवी वाटला आम्हाला म्हणून शेवटी असे ठरले की अड्डा पेटवून आपण थोड्याच अंतरावर लपून बसायचे आणि जर इतर झोपड्या पेटल्या तर मग आग विझवायला मदत करायची …

शेवटी सगळे पक्के झाले आणि आम्ही रात्रीची वाट पाहत बसलो , संध्याकाळी दुर्गा गार्डन मध्ये जाऊन गांजा ओढत बसलो , नाशिक मध्ये दारूची दुकाने , मटक्याचे अड्डे यांचे सगळ्यात जास्त ग्राहक होते प्रेस वाले ( करन्सी नोट प्रेस चे कामगार ) रात्रपाळी करण्याऱ्या लोकांची बारा वाजता जेवणाची सुट्टी होते व त्यानंतर हे लोक सुमारे १ वाजेपर्यंत दारूची दुकाने मटक्याचे अड्डे येथे येऊन आपला कार्यभाग उरकून पुन्हा कामावर हजर होत असत , तसेच रात्री १२ ला ‘ क्लोज ” चा आकडा येत असे ( मटका खेळणाऱ्या माणसाला हे ओपन , क्लोज असे शब्द समजण्यास अडचण जाणार नाही ) . म्हणजे आम्हाला आमचे काम रात्री १ नंतर पार पडावे लागणार होते . आम्ही दुर्गा गार्डनमध्येच रात्री एक वाजेपर्यंत टाईम पास ( गांजा ओढणे ) करत बसलो होतो . जरा खतरनाक मिशन असल्याने सगळे जरा गंभीरच झाले होते , आमच्यातील एकदोन जण जर जास्त चिंतीत होते ते सारखे शंका कुशंका काढत होते व आम्हाला त्यांना धीर द्यावा लागत होता अधिक धैर्य हवे म्हणून त्या दिवशी गांजा सोबत दारू पिणे देखील अपरिहार्य होतेच . शेवटी एकदाचा एक वाजला आणि आमची टोळी मिशन वर निघाली , काहीही न बोलता आम्ही चाललो होतो दुर्गा गार्डन पासून त्या मटक्याच्या अड्ड्या पर्यंतचे अंतर साधारणपणे २ की मी . होते थोडे चालून गेल्यावर एकाला आम्ही पुढे सायकलवर सगळे आलबेल आहे की नाही ते पाहण्यास पाठवले …

हळू हळू आम्ही पुढे चाललो होतो आता मटक्याचा अड्डा जवळ आला होता , तितक्यात आम्ही सायकल वर पाठवलेला तो मित्र आला व म्हणाला ‘ च्यायला सगळा ‘ लोचा ‘ झाला यार ..! तेथे खूप गर्दी जमलेली आहे कशाची तरी ” आम्हाला काही समजेना नेमकी काय भानगड झाली ते , मनात एक विचार असाही आला की आपल्यातील कोणी फुटले तर नाही त्याने कदाचित ही बातमी लोकांना देऊन सावध तर केले नसेल ? या विचाराने आम्ही घाबरलो व तेथेच थांबलो नेमके काय करावे ते सुचेना , शेवटी अगदी जवळ न जाता थोडे लांबून नेमके काय झाले याची माहिती काढायला म्हणून पुढे गेलो तर रडण्याचे आवाज एकू येऊ लागले आणि एकाला अजून जवळ पाठवले आणि शेवटी खरी भानगड काय झालीय ते समजले , तेथे रात्री सुमारे १२.३० च्या सुमारास बाजूच्या झोपडीतील एक आजारी माणूस मृत्यू पावला होता व त्याची सगळी गर्दी जमली होती व रडारड सुरु होती . बोंबला म्हणजे आता आज काही आपले काम होणार नाही हे लक्ष्यात आले तसेच एकदम मनावरचे ओझे उतरल्यासारखे झाले आमच्यातील कोणीही फुटलेला नाही हे समाधान होतेच . त्यादिवशी नेमके एकाचा मृत्यू व्हावा व आमची मिशन फेल व्हावी यात काय योगायोग असावा यावर मग चर्चा सुरु झाली ..

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..