नवीन लेखन...

चमत्कार को नमस्कार ! (नशायात्रा – भाग २)

एकीकडे देव नाही हे जरी मनाने ठरवले असले व अनिर्बंध जगणे सुरु असले तरी लहानपणापासून दिले गेलेले संस्कार इतक्या सहजा सहजी पूर्णपणे संपवणे शक्य नसते, तसेच जगात अनेक गोष्टी अश्या घडत असतात की जेथे विज्ञान नेमकी मीमांसा करू शकत नाही हे शक्य असेल की या गोष्टी घडल्याही नसतील तर लोकांनी एकाचे दोन करून एकमेकांना सांगितल्या असाव्यात किवा देवभोळेपणाच्या आहारी जाऊन अनेक चत्मकार घडल्याचा दावा केला असेल. शिर्डीचे श्री साईबाबा , संत गजानन महाराज , सत्यसाईबाबा , तसेच गावोगावी असलेले थोर साधू , महात्मे यांचे चत्मकार वाचल्यावर मन जरा विचलित होत असे व आपण देव मानत नाही म्हणजे काहीतरी चूक करतो आहोत अशी अपराधी पणाची भावना अधून मधून वाटत असे पण त्यावर माझ्या कडे गांजा , दारू , ब्राऊन शुगर वैगरे व्यसने करण्याचा उपाय होताच …

आमचा एक जरा वयाने मोठा मात्र कसलेही व्यसन नसलेला मित्र होता बाबुभाई शेख म्हणून तो सैलानी बाबांचा भक्त होता व त्याचे वडील अगदी साधे पण सैलानी बाबांचे निस्सीम भक्त होते त्यांच्या अंगात दर गुरुवारी सैलानी बाबा येत असत व त्या दिवशी त्यांच्या घरी दरबार भरत असे , म्हणजे अनेक वेगवेगळ्या चिंतानी ग्रासलेले लोक तेथे जमत व बाबुभाई चे वडील त्यांना काहीतरी यंत्र अथवा मंत्र ऐका चिठ्ठीवर लिहून देत असत . एकदा गुरुवारी आम्ही तेथे सहज बाबुभाई सोबत गेलो होतो तेव्हा तेथे सर्व वातावरण श्रद्धेने भरलेले होते , बाबुभाई चे वडील सैलानी बाबांच्या मोठ्या फोटोसमोर वज्रासनात बसले होते आणि डोळे मिटून तोंडाने काहीतरी पुटपुटत होते ते एरवी डोक्यावर पांढरी टोपी घालत असत मात्र त्यादिवशी त्यांनी डोक्याला ऐक हिरवा रुमाल गुंडाळलेला होता , समोर उदबत्त्या लावल्या होत्या तसेच एका ताटलीत धूप जळत होता , हॉल मध्ये काही स्त्रिया आणि पुरुष होते सर्व भक्ती भावाने डोळे मिटून बसले होते सर्व जातीधर्माचे लोक त्यात होते .

काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि सर्वांसमोर हाताची मुठ उघडली तर त्यांच्या तळहातावर एक लाल मणी होता तो त्यांनी एका माणसाला समोर बोलावून दिला व त्याला सांगितले मणी सतत शरीराला लागून राहील असा परिधान कर तुझे काम होईल …नंतर मला समजले की तो मणी त्यांनी हातातून जादूने काढला होता ..( ती हातचलाखी होती हे खूप नंतर लक्षात आले माझ्या )

मी थक्कच झालो आणि मग मी बाबुभाई कडून एक सैलानी बाबांचा फोटो घेऊन तो खिशात ठेवू लागलो . बाबूभाई बोलण्यात खूप हजरजबाबी आणि चतुर होता मराठी अगदी उत्तम बोलत असे तो मग रोज आम्हाला सैलानी बाबांचे वेगवेगळे चमत्कार सांगू लागला तसेच तो भूता खेतांच्या गोष्टी देखील सांगत असे व त्याचे वडील भूत देखील उतरवतात ही माहिती समजली मी त्याला अनेक प्रश्न विचारात असे पण तो शिताफीने त्याची उत्तरे देत असे , एकदा बाबुभाई सोबत आम्ही मित्र सैलानी बाबांचे प्रसिद्ध ठिकाण ‘ बुलढाणा ‘ जिल्ह्यात देखील बाबांच्या उरूस आणि संदल साठी तीन दिवस गेलो होतो…

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..