चीज आणि गोड पदार्थ खाणाऱ्यांसाठी आजचा दिवस पर्वणीचा ठरू शकतो. कारण आज राष्ट्रीय चीजकेक दिवस साजरा केला जातो.
चीज आणि केक स्वतंत्रपणे जगभरात प्रसिद्ध आहेत , पण एकत्रितरित्याही ते सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. ह्या चीजकेकचे जगभरात खूप चाहते आहेत.
आपण ह्या दिवसाचा इतिहास जाणून घेऊ. असं म्हटलं जातं की , चीजकेकची नक्की उत्पत्ती केव्हा झाली हे नक्की सांगणं कठीण आहे. परंतु प्राचीन ग्रीसच्या पूर्वार्धात तो शोध लावता येऊ शकत होता. त्यावेळी वापरण्यात आलेल्या पाककृतीमध्ये फक्त चीज , मैदा आणि मधासारख्या मूलभूत घटकांचा समावेश होता. विशेष म्हणजे ७७६ B.C. मध्ये घेण्यात आलेल्या ऑलिंपिक्स च्या स्पर्धेत ग्रीकच्या अॕथलेट्सना हा चीजकेक देण्यात आला होता.
जसजसा वेळ जात होता तसतसा क्रीममध्ये सुसंगतेचे परिपूर्ण परिमाण मिळविण्यासाठी त्याच्या कृतीत बदल करण्यात आला. १८७२ साली न्यूयॉर्कचे दुग्धव्यवसाय करणारे विल्यम लॉरेन्स नकळत क्रीम चीज घेऊन आला. त्यावेळी तो न्युफचेल नावाच्या फ्रेंच चीजची कॉपी बनविण्याचा प्रयत्न करीत होता. पुढे ते क्रीम चीज इतकं लोकप्रिय झालं की ते पॅक करून स्थानिक दुकानांमध्ये वितरित करण्यात आले.
वेळ निघून गेला आणि न्यूयॉर्क मधून जर्मनीमध्ये स्थलांतरित झालेल्या अरनॉल्ड रूबेनला एका कार्यक्रमात चीज देण्यात आले. तो त्यावर इतका मोहित झाला की न्यूयॉर्क चीजकेकची पाककृती साधली जाईपर्यंत त्याने पाककृतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
पुढे चीजकेक अमेरिकन संस्कृतीचा इतका महत्वाचा भाग झाला की , ३० जुलै १९८५ पासून तो दिवस राष्ट्रीय चीजकेक दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.
– आदित्य दि. संभूस
संदर्भ – माहितीजाल
फोटो सौजन्य – गूगल
Leave a Reply