नवीन लेखन...

अमेरिकेतील राष्ट्रीय हॉट फज संडे दिवस

मंडळी ice cream हा बऱ्याच लोकांचा weak point असतो. त्यात ice cream ला सजावट करून जर कोणी समोर आणून ठेवले तर खवय्यांच्या तोंडातून पाणी न वाहिलं तर नवलच! आता तुम्हांला वाटेल की , हा बोलतोय ते बरोबर आहे पण , आज ह्याला ice cream अचानक कसं काय आठवलं? मंडळी त्याला एक विशेष कारण आहे. आज दिनांक २५ जुलै ! आज युनायटेड स्टेट्स (US) मध्ये National Hot Fudge Sundae Day हा दिवस साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊ ह्या आगळ्यावेगळ्या दिवसाचा इतिहास!

National Hot Fudge Sundae Day हा स्वादिष्ट शैलीत , राष्ट्रीय आईस्क्रीम महिन्याचे प्रतिनिधित्व करतो. इ.स. १९०६ पासून गरम आणि थंड जिनस एकत्र करून , वर एक सुंदरशी लालचुटुक आणि लक्षवेधक चेरी ठेऊन हे चवदार आईस्क्रीम नव्हे नव्हे मिष्टान्न देण्यास सुरुवात करण्यात आली असं म्हणतात पण ह्या बद्दल जास्त खोलात जाऊन अभ्यास केला असता असं आढळून आलं की , दिनांक ५ ऑक्टोबर १८९२ रोजी इथका डेली जर्नल मधील जाहिरातीने आईस्क्रीम ट्रीटची सुरुवात रविवारच्या स्पेलिंगने पारंपरिक पद्धतीने केली. एखाद्या IceCream Sundae चा सर्वात प्राचीन दाखला इथका , न्यूयॉर्क जाहिरात असूनही ह्याचा प्रारंभकर्ता नक्की कोण ह्यावर वाद आहे.

विस्कॉस्निन ह्यांनी असा दावा केला आहे की ड्रगिस्ट एडवर्ड बर्नर्स ह्यांनी १८८१ मध्ये पहिला IceCream Sundae दिला होता. या कथेनुसार , ग्राहक जॉर्ज हॅलाऊअर ह्यांनी रविवारी एक आईस्क्रीम सोडा मागविला होता. त्यावेळच्या अध्यादेशांनी शब्बाथ दिवशी आईस्क्रीम सोडा विक्रीस प्रतिबंध केला होता. तरीही बॅर्नर्स ह्यांनी तडजोड केली आणि त्यांनी आईस्क्रीम सोडा एक डिश वजा सोड्यात सर्व्ह केला. ह्याव्यतिरिक्त , त्यांनी आईस्क्रीम वर चॉकलेट सिरप टाकून आईस्क्रीम सजविण्याचा प्रथम क्रमांक पटकावला. ही कथा घडली त्यादिवशी रविवार असून त्यावेळी बर्नर्स अवघ्या १८ वर्षांचे होते.

मंडळी! आईस्क्रीमचा पहिला शोध कोणी लावला , ह्या वादात आपणांस पडण्याची काही आवश्यकता नाही. आपण फक्त ह्याचा आस्वाद कसा घेता येईल आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवून मनःशांती कशी मिळवता येईल ह्यावर आपलं लक्ष केंद्रित करूयात.

चला तर , पटकन कृती कॉपी करून घ्या जी फार सोपी आणि कमी वेळात तयार करता येण्यासारखी आहे.

कृती :- सर्वप्रथम एक डिश घ्या. त्या डिशमध्ये २ स्कुप व्हॅनिला आईस्क्रीम घ्या. त्यावर hot fudge सॉस घाला. थोडंसं व्हीप्ड क्रीम. आवडत असल्यास सुका मेवा specially काजू , पिस्ता हे थोड्याप्रमाणात वर पेरू शकता आणि सरतेशेवटी डोळ्यांना लुभावणारी लाल लाल रंगाची , चमकदार मॅराशिनो चेरी सगळ्यात top ला ठेवा. घ्या तुमची रेसिपी तयार. 

काय मग ! सुटलं ना तोंडाला पाणी? अहो मग वाट कसली बघताय? लागा पटापट कामाला!
कारण मंडळी खाण्यासाठी जन्म आपुला !

– आदित्य दि. संभूस.

संदर्भ :- गुगलबाई आणि माहितीजाल
फोटो गूगल वरून साभार.

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..