सकाळी सकाळी ताज्या हवामानात निसर्गसौंदर्य न्याहाळण्याची मजा काही औरच असते. त्यात सुंदर कोवळा सूर्यप्रकाश जर अंगावर पडला तर शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. अशा या उत्साहाच्या वातावरणात नौकाविहार करायला मिळाला तर आनंदाला पारावर उरणार नाही.
मंडळी आज ५ ऑगस्ट आणि ऑगस्ट महिन्यातला पहिला बुधवार आहे. ह्या दिवशी कॅनडामध्ये एक आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा दिवस साजरा केला जातो. त्या दिवसाचं नाव आहे “National Regatta Day” म्हणजेच राष्ट्रीय नौकाशर्यत दिन. ह्या दिवशी सुट्टी देण्यात येते , पण ही सुट्टी संपूर्णतः तिथल्या वातावरणावर अवलंबून असते. तिथले सरकारी अधिकारी सकाळी लवकर उठून पहिले वातावरणाचा अंदाज घेतात आणि मग सुट्टीची घोषणा करतात.
ह्या दिवशी सकाळी सगळे नौकाशर्यतीचे खेळाडू स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतात आणि सगळेजण आपल्या चमूला / संघाला घेऊन स्पर्धेला सुरुवात करतात. स्पर्धेत खेळाडूंना खाली उतरून शिड डोलकाठ्यांनी व दोरखंडाने जोडायचे असते आणि पुन्हा त्यांना विस्कळीत करून खेळाडूंना पुन्हा नौकेत बसून प्रवास सुरू करायचा असतो. अशा पद्धतीने खेळल्याने एक सांघिक भावना निर्माण होत असल्याचे खेळाडूंचं मत आहे.
आपल्याला एकीच्या बळाची गोष्ट ठाऊक असल्याने आपल्यालाही हा खेळ खेळण्यास काही हरकत नाही.
Leave a Reply