रूट बिअर ! इथे बिअरचा उल्लेख केल्यावर बऱ्याच जणांच्या भुवया उंचावतील. मद्यप्रेमींना तर हा कुठला नवीन प्रकार बाजारात आला आहे आणि कधी एकदा आपण ह्याला पिऊ असा प्रश्न पडत असेल. पण मी तुम्हां सगळ्यांना सांगू इच्छितो की मी ज्या बिअरचा उल्लेख केलाय ती नॉन अल्कोहॉलिक बिअर आहे. अल्कोहॉलचं प्रमाणच जाणून घ्यायची इच्छा असल्यास मी सांगतो. फक्त ०.०५% अल्कोहॉल ह्यात समाविष्ट असते.
रूट बिअर म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी आजचा मुहूर्तच योग्य आहे कारण , आजच्या दिवशीच परदेशात National Root Beer Float Day साजरा केला जातो. हा दिवस ऑगस्ट महिन्यात पहिल्या गुरुवारी साजरा केला जातो.
आपण ह्याच्या इतिहासाबद्दल थोडंस जाणून घेऊ. आधुनिक काळातील रूट बिअर १ 18०० च्या उत्तरार्धातील आहे, जेव्हा चार्ल्स हियर्स (Charles Hires ) नावाच्या रसायनशास्त्रज्ञाने सुरुवातीला “रूट टी” नावाचे ससाफ्रास-आधारित पेय विकण्यास सुरुवात केली. हायर्स हा संयमी चळवळीचा एक भाग होता आणि त्याची पेय अल्कोहोलिक ड्रिंकला पर्याय म्हणून दिसली पाहिजे अशी त्याची इच्छा होती. तथापि, त्याला खात्री होती की “रूट बिअर” हे नाव अधिक विकले जाईल आणि आज आपल्या सर्वांना परिचित असलेल्या Non Alcoholic बिअरचा जन्म झाला.
ह्यात वापरले जाणारे घटक म्हणजे शुद्ध (Filtered) पाणी , बर्च झाडाचे साल , स्टार बडीशोप , सरसापरीला मूळ , सासाफ्रासची पानं , vanilla beans इत्यादी.
मित्रांनो हे साहित्य रूट बिअर तयार करण्यासाठी वापरलं जातं. तुम्हांला जर रूट बिअर बनवण्याची कृती हवी असेल तर ती सहज माहितीजालावर उपलब्ध आहे.
Leave a Reply