दिनांक ४ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन नॅशनल सेफ्टी डे साजरा केला जातो.
राष्ट्रीय सुरक्षा परिषद भारतात ४ मार्च १९६६ रोजी स्थापन करण्यात आली, म्हणून हा दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘नॅशनल सेफ्टी कौन्सिल’ ही एक स्वायत्त संस्था आहे, जी निस्वार्थ भावनेने कार्य करते. या संस्थेची स्थापना १९६६ साली मुंबई सोसायटी कायद्यांतर्गत करण्यात आली, ज्यामध्ये ८ हजार सदस्य होते. यानंतर १९७२ मध्ये या संस्थेने ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर लगेचच तो राष्ट्रीय सुरक्षा दिना ऐवजी ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात आला.
हा दिवस पहिल्यांदा ४ मार्च १९६६ रोजी साजरा करण्यात आला, ज्यामध्ये आठ हजार सदस्यांनी सहभाग घेतला होता, त्यावेळी देशातील जनतेला सुरक्षेसाठी जागृत करण्याच्या उद्देशाने हा दिवस आणण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांना प्रत्येकाचे संरक्षण कसे करावे? हे माहित असले पाहिजे. देश आणि समाजातील इतर लोकांच्या सुरक्षेचे भान ठेवून काम केले पाहिजे, त्या दिशेने प्रवृत्त केले. ४ ते १० मार्च हा संपूर्ण आठवडा मोहीम म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय सुरक्षा दिनादरम्यान, औद्योगिक अपघात टाळण्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय सुरक्षा दिन विशेषत: देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात असलेल्या हजारो सैनिकांना समर्पित आहे. यावर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिनाची थीम “आमचे लक्ष्य-शून्य हार्म” अशी निश्चित करण्यात आली आहे.
संकलन. संजीव_वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता
Leave a Reply